बेलाच्या पानावरती साकारले एक इंचाचे महादेवाचे सुंदर चित्र

गवाणे येथील युवा चित्रकार अक्षय मेस्त्री यांची कलाकृती

आचरा (प्रतिनिधी) : असं म्हणतात की महादेवाला बेलाचे पान वाहिले जाते आणि त्याचं बेलाच्या पानावरती देवगड तालुक्यातील गवाणे येथील युवा चित्रकार अक्षय मेस्त्री याने महाशिवरात्री निमित्त एक इंचाची महादेवाची सुबक कलाकृती साकारली आहे. चित्रकार अक्षय मेस्त्री हा नेहमीच विविध सन, उत्सव यांच्या निमित्ताने विविध स्वरूपात आपली कला जोपासत असतो. त्याचबरोबर त्यातून सामाजिक संदेश देखील देत असतो. आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने महादेवाची कलाकृती बेलाच्या पानावरती साकारण्याचा निश्चय केला होता. त्याप्रमाणे बेलाच्या पानावरती महादेवाचे चित्र साकारताना त्या चित्राची उंची १ इंच आणि लांबी २ इंच ठेवून ही कलाकृती साकारली आहे. बेलाच्या पानावरती शंकर महादेवाचे चित्र साकारायला फक्त वीस मिनिटाचा कालावधी लागला. हे चित्र त्याने एक्रलिक कलर वापरून बेलाच्या पानावर महादेवाची कलाकृती केली आहे. यापूर्वी त्याने शंकावरती तसेच दगडावरती महाकाय अशी विविध चित्रे साकारली आहेत. अक्षय मेस्त्री याच्या या वैशिष्ट्यपूर्ण कलेबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

error: Content is protected !!