मसूरे (प्रतिनिधी) : आंगणेवाडी नाट्य मंडळ मुंबई- आंगणेवाडी यांच्या हिरक महोत्सवी वर्षा निमित्त श्री देवी भराडी रंगमंच आंगणेवाडी येथे “कुणीतरी आहे तिथं “ हे नाटक 27 फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजता सादर होणार आहे. या नाटकाचे दिग्दर्शक महेश सावंत, नेपथ्य शरद कांबळी आणि अंकुश कांबळी, रंगभूषा तारक कांबळी यांची आहे. या नाटकामध्ये जयवंत आंगणे, भिकाजी आंगणे, जयेश आंगणे कुणाल आंगणे, तनुराज आंगणे, गजानन उर्फ बाबू आंगणे, दिनेश आंगणे, हर्षदा बागायतकर, शुभदा टीकम, दीप्ती ढवण यांच्या भूमिका आहेत. उपस्थितीचे आवाहन आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांच्यावतीने करण्यात आले आहे.
आंगणेवाडी येथे 27 फेब्रुवारी रोजी “कुणीतरी आहे तिथं ” नाट्यप्रयोग !











