सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशन शाखा वेंगुर्लाच्या अध्यक्ष पदी झिलू गोसावी यांची निवड.

चौके (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशन शाखा वेंगुर्लाच्या विद्यमान कार्यकारीणीची मुदत संपल्यानंतर नवीन कार्यकारीणी निवडण्यासाठी ३० जानेवारी रोजी विठ्ठलमंदिर भुजनाकवाडी, वेंगुर्ला येथे यशवंत गोविंद मठकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली व सर्वांनुमते नवीन कार्यकारीणीची निवड करण्यात आली.

यावेळी नूतन कार्यकारीणी अध्यक्ष म्हणून झिलू दादू गोसावी यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष पदी विठ्ठल महादेव खोत, विनायक गोपाळ उमर्ये, हनुमंत रामचंद्र तेली, आणि विद्याधर नारायण कडूलकर यांची निवड करण्यात आली. तर सचिव म्हणून विठ्ठल लाडू कदम, सहसचिव अरुण बाबाजी मयेकर, सल्लागार सत्यवान गोविंद पेडणेकर, जिल्हा प्रतिनिधी किशोर जिवाजी नरसुले, भरत बाबुराव आवळे, खजिनदार म्हणून कैवल्य निळकंठ पवार अशी निवड करण्यात आली. याबरोबरच कार्यकारीणी सदस्य पदी दिलीप वासुदेव प्रभू खानोलकर, मंगेश वसंत राऊळ, राजन भिसाजी बेहेरे, गुरुनाथ अनंत बांदवलकर, यशवंत गोविंद मठकर, सुरेश शांताराम कामत, चित्रा खानोलकर, दीपा वेंगुर्लेकर, प्रियदर्शनी कावले, विद्या प्रकाश मोर्ये अशाप्रकारे सर्वांना मते नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

error: Content is protected !!