आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गातील आरोग्य सुविधांसाठी आवश्यक मनुष्यबळ व सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करा -मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

प्रलंबित विकासकामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना तसेच जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना दर्जेदार आणि प्रभावी आरोग्यसेवा उपलब्ध होण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, रुग्णालयांतील पायाभूत सुविधा आणि सर्व आवश्यक सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून द्याव्यात. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेशी संबंधित प्रलंबित…

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी मंत्री नितेश राणेंनी घेतले सहकुटुंब श्री गणरायाचे दर्शन

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी विराजमान श्री गणेशाचे सहकुटुंब दर्शन घेतले. यावेळी मंत्री नितेश राणे यांनी श्री गणरायाची मनोभावे आरती करून आशीर्वाद घेतले.…

मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत नावनोंदणी व दुरुस्तीसाठी बी.एल.ओं शी संपर्क साधावा

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे आवाहन सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यात मतदार याद्यांच्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे. या कार्यक्रमांतर्गत प्राप्त दावे व हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू झाली…

कणकवली आगारातील एसटी कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा; हरवलेली बॅग मालकाला परत

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली आगाराचे वाहक प्रवीण नेवरेकर आणि चालक सतीशचंद्र रावराणे यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे लॅपटॉप, शैक्षणिक साहित्य आणि महत्त्वाची कागदपत्रे असलेली हरवलेली बॅग तिच्या मालकाला सुखरूप परत मिळाली. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सोमवार, दि. १४ सप्टेंबर…

देवली पुलाजवळ मोटरसायकल अपघातात दोघांनी जीव गमावला ; एक गंभीर जखमी

निकम कुटुंबावर शोककळा मालवण (प्रतिनिधी) : तालुक्यातील देवली पुलानजीक काल रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास दुचाकीचा भीषण अपघात घडला. या अपघातात दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली…

२५ वर्षांहून अधिक काळ सुरू असलेली कुडाळ–देवगड बसफेरी महिनाभर बंद; विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांसह चाकरमान्यांचे हाल

आचरा (प्रतिनिधी) : गणेशोत्सवाच्या ऐन हंगामात प्रवाशांना एसटी कडून दिलासा मिळणे अपेक्षित असताना, चक्क पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात जाणारी कुडाळ आगाराची २५ वर्षांहून अधिक काळ सुरू असलेली कुडाळ–देवगड बससेवेलाच ब्रेक लागला आहे. कुडाळ आगारातून सायंकाळी ५ वाजता सुटणारी कुडाळ–कणकवली–त्रिंबक–चिंदर–आचरा मार्गे देवगड जाणारी…

माजी विद्यार्थ्यांच्या मनात संस्थेवरील दृढ विश्वास; माजी विद्यार्थी सत्यपाल लाडगावकर यांचे प्रतिपादन

शाळेच्या इमारत नूतनीकरणासाठी एस व सी बॅच १९८६-८७ कडून १ लाख ५० हजारांची आर्थिक साथ संस्थेच्या पारदर्शक कारभाराला माजी विद्यार्थ्यांची विश्वासाची पावती शिरगाव (प्रतिनिधी) : एखाद्या संस्थेच्या कार्यपद्धतीवर विश्वास निर्माण होणे ही त्या संस्थेच्या यशाची खरी पावती असते. आणि हा…

असलदे येथे दुचाकीस्वारांच्या अंगावर कोसळले झाड; युवकाचा जागीच मृत्यू

मित्र गंभीर जखमी; नांदगाव–असलदे मार्गावरील धक्कादायक घटना कणकवली (प्रतिनिधी) : असलदे येथे रस्त्याने दुचाकीवरून जात असलेल्या दोन युवकांच्या अंगावर अचानक मोठे झाड कोसळल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (१५ सप्टेंबर) दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत प्रतीक प्रकाश वाळके (वय…

सेवा संकल्प अभियानातून जिल्ह्यात सेवा उपक्रमांची मालिका

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबरला तिन्ही विधानसभा मतदारसंघांत ‘आशीर्वादाचा दिवा’ सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सेवा संकल्प अभियान संपूर्ण देशात सुरू झालेले असून अभियान कालावधी १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ असा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी च्या वाढदिवसानिमित्त सर्वप्रथम १७ सप्टेंबर रोजी…

सेवाज्येष्ठतेचा निर्णय ११ महिने प्रलंबित; सहाय्यक शिक्षकाचे जि.प.समोर बेमुदत उपोषण

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सेवा जेष्ठतेचा निर्णय तब्बल ११ महिने प्रलंबित ठेवल्याने सेट म ग हायस्कूल देवगडचे सहाय्यक शिक्षक भीमराव येडगे यांनी आज पासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे जि.प. समोर सहाय्यक शिक्षकाने ऐन गणेशोत्सव काळात आमरण उपोषण सुरू…

error: Content is protected !!