ज्येष्ठ कवयित्री प्रा. डॉ. शरयू आसोलकर यांचे अपघाती निधन

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जेष्ठ कवयित्री प्रा. शरयू आसोलकर यांचे सोमवार 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास अपघाती निधन झाले. त्या राजापूरहून सावंतवाडी च्या दिशेने जात असताना त्यांच्या कारला मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव ओटव ब्रिजवर अपघात घडला. अचानक रस्त्यात गुरे आल्यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि त्यांची कार ब्रिजवर डिव्हायडर ला जोरात धडकली. कार ला पुढील बाजूने जोरात धक्का बसला. अपघातानंतर चालक आणि चालकाच्या बाजूच्या सीट चे एअरबॅग्ज उघडल्या होत्या. जखमी अवस्थेत प्रा.शरयू याना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता हलविण्यात आले. मात्र रुग्णालयात पोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालावली होती. या अपघातात प्रा. आसोलकर यांचा भाऊ गंभीर जखमी झाला आहे.

error: Content is protected !!