Category बातम्या

कुडाळात किरीट सोमय्या विरोधात जोडे मारो आंदोलन

शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आक्रमक कुडाळ (अमोल गोसावी) : भाजप नेते किरीट सोमय्या यांची अश्लील चित्रफित व्हायरल झाली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या विरोधात आज उध्दव ठाकरे शिवसेना गटाकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांच्या पोस्टरवर जोडे मारून निषेध करण्यात आला. हा…

पुराच्या पाण्यात दुचाकी वाहून गेली दोघेजण सुदैवाने बचावले

एकजण किरकोळ जखमी तब्बल १८ तासानंतर दुचाकी शोधण्यात यश चाफेखोल – वडाचापाट मार्गावरील दुर्घटना चौके (अमोल गोसावी) : मालवण तालुक्यातील चाफेखोल ते वडाचापाट दरम्यानच्या चाफेखोल माळवाडी नजीक असलेल्या छोट्या पुलावरून पुराच्या पाण्याच्या तीव्र प्रवाहात दुचाकी वाहून जाण्याची दुर्घटना काल मंगळवार…

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश

युवासेना विभागप्रमुख सिद्धेश राणे यांची माहिती कणकवली (प्रतिनिधी): गेली अनेक वर्षे लोकांची मागणी असलेल्या फोंडा विभागातील पुलांच्या बांधकामासाठी पुरवणी अर्थसंकल्पात ५ कोटी ८८ लाख मंजूर करण्यात आले आहेत. यासाठी युवासेना विभागप्रमुख सिद्धेश राणे यांनी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक…

वाघेरी जोड रस्त्यासाठी ३० लाखांचा निधी केवळ आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून ; उबाठा सेनेचा फुकाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न

माजी सभापती मनोज रावराणेंनी केला यशस्वी पाठपुरावा लोरे शक्तिकेंद्रप्रमुख नरेश गुरव यांचा दावा कणकवली (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील वाघेरी या गावातील मुख्य रस्ता (वाघेरी जोडरस्ता) कामासाठी( ३० लाख )रुपयांच्या निधीस आमदार नितेशजी राणे यांच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजुरी दिलेली आहे.…

महेश मांजरेकर यांचा कोकण आयडॉल पुरस्काराने सन्मान

आचरा (प्रतिनिधी): ग्लोबल कोकण आणि क्लबच्यावतीने कोकणभूमी प्रतिष्ठान व ग्लोबल कोकणचे संस्थापक अध्यक्ष संजय यादवराव यांच्या हस्ते मालवण तालुक्यातील हडी गावचे माजी सरपंच महेश बाळकृष्ण मांजरेकर यांना दादर येथील प्राचार्ज बी. एन, वैद्य सभागृहात कोकण आयडाँल आदर्श सरपंच 2023 पुरस्काराने…

प्रभाकर सावंत यांची सिंधुदुर्ग भाजपा जिल्हाध्यक्षपदी निवड

ओरोस (प्रतिनिधी): भाजपचे निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्ते असलेले प्रभाकर सावंत यांची भाजप प्रदेश स्तरावरून जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर नवीन जिल्हाध्यक्ष नेमणूक करण्यासाठी कार्यक्रम राबविण्यात आला. यात सावंत यांनी बाजी मारलेली आहे. या…

जि.प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१ च्या पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षपदी श्री.मंगेश ब्रम्हदंडे यांची निवड

तर माता पालक संघाच्या उपाध्यक्षपदी प्रियंका गुरव यांची निवड खारेपाटण ( प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेच्या शैशणिक वर्ष सन – २०२३ – २४ या एका वर्षासाठी नव्याने निवड करण्यात आलेल्या पालक…

जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस कुडाळ तालुक्यात

माणगाव खोऱ्यातील २७ गावांचा संपर्क तुटला कुडाळ ( अमोल गोसावी ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. तर नदी, नाले, ओढ्यांना देखील पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात आज यलो अलर्ट देण्यात आला होता. मात्र,…

वाघेरी जोड रस्त्यासाठी ३० लाख मंजूर.‌. वचनपूर्तीत यश – सिद्धेश राणे

कणकवली (प्रतिनिधी) : वाघेरी, ता.कणकवली गेल्या काही वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेला वाघेरी गावातील मुख्य रस्ता (वाघेरी जोडरस्ता) या खड्येयुक्त रस्त्यासाठी पुरवणी बजेट मधून ३० लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याने वचनपूर्ती केल्याचे समाधान मिळाल्याचा आनंद शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना विभागप्रमुख…

बंद विमा पॉलिसी ची मॅच्युरिटी रक्कम देण्याच्या बहाण्याने 27 लाख 34 हजारांची फसवणूक

देवगड (प्रतिनिधी) : बंद पडलेल्या पॉलीसीची मुदत पुर्ण झाल्यानंतर मिळणारी रक्कम मिळून देतो असे सांगून त्या पॉलीशीचे हप्ते टप्या टप्याने अज्ञात ईसमाने दिलेल्या बँक खात्यात जमा करा असे सांगून पुरळ कोठारवाडी येथील मुंबई विदयापिठाच्या सेवा निवृत्त कर्मचा-याची सुमारे 27 लाख…

error: Content is protected !!