तर माता पालक संघाच्या उपाध्यक्षपदी प्रियंका गुरव यांची निवड
खारेपाटण ( प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेच्या शैशणिक वर्ष सन – २०२३ – २४ या एका वर्षासाठी नव्याने निवड करण्यात आलेल्या पालक – शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष पदी श्री मंगेश वसंत ब्रम्हदंडे यांची तर माता – पालक संघाच्या उपाध्यक्ष पदी सौ. प्रियांका स्वप्निल गुरव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच दोन्ही समितीच्या अध्यक्षपदी शाळेचे मुख्याद्यापक श्री प्रदीप श्रावणकर हे पदसिद्ध अध्यक्ष असतील. नवनिर्वाचित उपाध्यक्ष व समिती सदस्य यांचे पालक,ग्रामस्थ व शाळेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेची पालक सभा नुकतीच शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ प्राप्ती कट्टी यांच्या अध्यक्षतेखाली शाळेच्या सभागृहात संपन्न झाली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष श्री संतोष पाटणकर, सौ.गौरी शिंदे,समिती सदस्य समीक्षा शेट्ये,सचिन भालेकर,उमेश गुरव शाळेचे पालक श्री उद्धव साबळे आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.शाळेचे उच्यश्रेणी मुख्याद्यापक श्री प्रदीप श्रावणकर सर यांनी शाळेच्या वतीने सर्व पालकांचे स्वागत करून मिटिगला सुरवात केली.यावेळी नविन निवड करण्यात आलेला पालक -शिक्षक संघ पुढील प्रमाणे –
उपाध्यक्ष – श्री मंगेश वसंत ब्रम्हदंडे, सदस्य – श्री मिथुन मनोहर शेंगाळे,सुरेंद्र रमेश धामापूरकर, सौ.निधी निशिकांत शिंदे,संध्या हर्षल पोरे,ममता चमनरान मेवाड,पूर्वा प्रसाद गाठे,प्रांजली प्रसन्नकुमार बाबरदेसाई,मानसी मनोज साटवीलकर,भाग्यश्री भालचंद्र सुतार,वृषाली रवींद्र नाडगौड,स्नेहा सुरेश हरयान,आरती अजय जेधे तर सचिव पदी शाळेच्या शिक्षिका सौ.रुपाली पारकर यांची निवड करण्यात आली.
तसेच माता – पालक संघ कार्यकारणी पुढील प्रमाणे —
उपाध्यक्ष – सौ प्रियंका गुरव, सदस्य – सौ.स्नेहा संजय साटवीलकर,ईशाली विशाल कोर्लेकर,प्रज्ञा ज्ञानेश्वर कासार,रुपाली मंगेश जाधव, खैरूनिसा रिजवान मालीम,सुप्रिया अतुल देवस्थळी,अनुपमा शकतिकुमार उपाध्ये,दर्शना दिनेश कानडे,सुषमा राजेश जाधव,अरुणा निलेश ब्रम्हदंडे,शीतल शशिकांत इंगळे तर सचिव पदी शाळेच्या शिक्षिका सौ आरती जेजोन यांची निवड करण्यात आली.











