माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश

युवासेना विभागप्रमुख सिद्धेश राणे यांची माहिती

कणकवली (प्रतिनिधी): गेली अनेक वर्षे लोकांची मागणी असलेल्या फोंडा विभागातील पुलांच्या बांधकामासाठी पुरवणी अर्थसंकल्पात ५ कोटी ८८ लाख मंजूर करण्यात आले आहेत. यासाठी युवासेना विभागप्रमुख सिद्धेश राणे यांनी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, अर्थमंत्री अजितदादा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, खा. विनायक राऊत यांच्याकडे पाठपुरावा केला होता. खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या विशेष प्रयत्नांतून हा निधी मंजूर करण्यात आला आहे. पावसाळ्यानंतर पुलाच्या प्रत्यक्ष कामास सुरवात होणार आहे. अशी माहिती युवासेना फोंडा विभागप्रमुख सिद्धेश राणे यांनी दिली आहे. फोंडा विभागातील फोंडा उत्तर बाजारपेठ- पटेलवाडी- गांगोचीवाडी रस्त्यावरील पूल, फोंडा गांगोवाडी रस्त्यावरील पूल, पियाळी- नांदगाव स्टेशन रोड वरील पूल व रस्ता दळणवळणासाठी महत्वाचा भाग आहेत. याठिकाणच्या जुन्या कॉजवे पुलावरून पावसाळयात वाहतूक करणे धोकादायक बनले होते. यामुळे लोकांचीही गैरसोय होत होती. याठिकाणी पुलांची पुनर्बांधणी व्हावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्याकडे केली होती. त्यावेळी लवकरात लवकर हा पूल बांधण्याचे आश्वासन खासदार विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांनी ग्रामस्थांना दिले होते. त्यानुसार युवासेना फोंडा विभागप्रमुख सिद्धेश राणे यांनी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता. त्यानुसार खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, अर्थमंत्री अजितदादा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा केला होता. या पाठपुरव्यास अखेर यश आले आहे. खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या विशेष प्रयत्नांतून या कामांसाठी ५ कोटी, ८८ लाखाची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. लोकांच्या सेवेसाठी पावसाळ्यानंतर लवकरात लवकर या पुलांचे बांधकाम करून पूल उभारण्यात येणार आहेत असे युवासेना फोंडा विभागप्रमुख सिद्धेश राणे यांनी सांगितले आहे.

error: Content is protected !!