आचरा (प्रतिनिधी): ग्लोबल कोकण आणि क्लबच्यावतीने कोकणभूमी प्रतिष्ठान व ग्लोबल कोकणचे संस्थापक अध्यक्ष संजय यादवराव यांच्या हस्ते मालवण तालुक्यातील हडी गावचे माजी सरपंच महेश बाळकृष्ण मांजरेकर यांना दादर येथील प्राचार्ज बी. एन, वैद्य सभागृहात कोकण आयडाँल आदर्श सरपंच 2023 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 75 वर्षे आणि समृद्ध कोकण चळवळीत 23 वर्षे यानिमित्त कोकणातील 75 असामान्य व्यक्तीमत्वांचा यावेळी गौरव करण्यात आला. कोकणातील आदर्श युवा सरपंच, आपल्या गावच्या विकासाकरिता झपाटलेल्या तरुण तसेच केंद्र व राज्य सरकारच्या योजना आपल्या गावात राबवणे तसेच बँकवाँटर टूरिझम व माशांची शेती विकसित करण्यासाठी हा कोकण आयडाँल आदर्श सरपंच सन्मान दिला जातो.












