Category बातम्या

ट्रक क्लीनरचा चाकूने स्वतःच्या गळ्यावर पोटावर वार करत आत्महत्येचा प्रयत्न

चौके साळेल परिसरातील चिरेखाणीनजीक घडली घटना गंभीर वार केल्याने क्लीनर युवकाची प्रकृती गंभीर चौके (प्रतिनिधी) : साळेल चौके परिसरात चिरेखाण व्यवसाय सुरू असलेल्या परिसरात कोल्हापूर गडहिंग्लज निलजी येथील चिरे भरण्यासाठी आलेल्या ट्रक वरील क्लीनर मानदेश निगोडा पाटील या युवकाने मंगळवार…

कट्टा पेंडुर काळसे मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य

लवकरात लवकर खड्डे न बुजविल्यास रास्तारोको करणार ठाकरे शिवसेना विभागप्रमुख शिवा भोजणे, युवा सेना विभागप्रमुख वंदेश ढोलम यांचा इशारा चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील कट्टा पेंडुर काळसे मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. नेमका रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ते हेच समजत…

‘नवीन कुर्ली’तील विकासकामांबाबत अनंत पिळणकरांचा आंदोलनाचा इशारा

ठेकेदार मर्जीने कामे करत असल्‍याचा आरोप धरणग्रस्‍तांची पिळवणूक, पण गावातील सत्ताधार्‍यांना मात्र वेगळा न्‍याय कणकवली (प्रतिनिधी) : नवीन कुर्ली वसाहत गावाच्‍या विकासासाठी साडेचार कोटी तसेच देवघर पाटबंधारे प्रकल्‍पासाठी ५० कोटींचा निधी त्‍यावेळी आमचे नेते जयंत पाटील हे जलसंधारण विभागाचे मंत्री…

खारेपाटण जि.प.केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांचे एस. टी. एस व ए. पी. जे अब्दुल कलाम परीक्षेत सुयश

खारेपाटण (प्रतिनिधी) : युवा संदेश प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या वतीने सन – २०२५ – २६ या शैशनिक वर्षी घेण्यात आलेल्या सिंधुरत्न टॅलेंट सर्च (STS) परीक्षा तसेच डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम अर्थात प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा…

देशसेवक जवानांना पब्लिक रिलेशन फाउंडेशनतर्फे राखी पाठवून रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम

सावंतवाडी (प्रतिनिधी) : देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत असलेल्या आणि आपल्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या भारतीय जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने पब्लिक रिलेशन फाउंडेशन, सिंधुदुर्ग यांच्या वतीने रक्षाबंधनानिमित्त विशेष उपक्रम राबविण्यात आला.या उपक्रमांतर्गत फाउंडेशनच्या बहिणींनी देशसेवा करणाऱ्या जवानांसाठी प्रेम, आपुलकी आणि…

वैश्यवाणी समाजाच्या OBC प्रश्नावर : आमदार प्रमोद जठार, आमदार किरण सामंत यांच्या पाठपुराव्याला यश

सन २००८ च्या शासन परिपत्रकाप्रमाणे निर्णय घेण्याचे मंत्री अतुल सावे यांचे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश मंत्री अतुल सावे, मंत्री उदय सामंत आमदार किरण सामंत, आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थिती बैठक संपन्न मुंबई (प्रतिनिधी) : दि. २५ ऑगस्ट २०२६ : वैश्यवाणी समाजाच्या…

तावडेंच्या पाठपुराव्याला यश; ओरोस महामार्गावर सुरक्षा उपाय सुरू

धोकादायक ठिकाणी कामाला सुरुवात; कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गनगरी मधील ओरोस येथील मुंबई-गोवा महामार्गावरील धोकादायक वळणे, अपुरी सुरक्षा व्यवस्था आणि सर्व्हिस रोडवरील अपघातांचा प्रश्न ग्रामपंचायत सदस्य योगेश तावडे यांनी सातत्याने लावून धरल्यानंतर अखेर प्रशासनाने त्याची दखल घेतली आहे.…

तावडेंच्या पाठपुराव्याला यश; ओरोस महामार्गावर सुरक्षा उपाय सुरूधोकादायक ठिकाणी कामाला सुरुवात; कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गनगरी मधील ओरोस येथील मुंबई-गोवा महामार्गावरील धोकादायक वळणे, अपुरी सुरक्षा व्यवस्था आणि सर्व्हिस रोडवरील अपघातांचा प्रश्न ग्रामपंचायत सदस्य योगेश तावडे यांनी सातत्याने लावून धरल्यानंतर अखेर प्रशासनाने त्याची दखल घेतली आहे. संबंधित धोकादायक ठिकाणी सुरक्षा उपाययोजनांची कामे सुरू…

पेट्रोलपंप चोरीप्रकरणी पाच निर्दोष

ओरोस येथील ५७ हजारांच्या चोरीचा आरोप सिद्ध करण्यात सरकारी पक्षाला अपयश ओरोस (प्रतिनिधी) : ओरोस येथील सिद्धी ऑटोमोबाईल पेट्रोलपंपावरून ५७ हजार रुपयांची रोकड चोरल्याच्या आरोपातून पाचही आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. सरकारी पक्षाला आरोपींचा गुन्ह्यातील प्रत्यक्ष सहभाग तसेच चोरीचा आरोप…

धामणस्करांना काव्यातून श्रद्धांजली

‘आम्ही साहित्यप्रेमी’च्या ‘श्रावणधारा’ कविसंमेलनात १५ कवींचा सहभाग ओरोस (प्रतिनिधी) : ज्येष्ठ कवी द. भा. धामणस्कर यांच्या निधनाने शब्दांचे मर्म जाणणाऱ्या संवेदनशील आणि ऋजू व्यक्तिमत्त्वाच्या कवीला मराठी काव्यविश्व मुकले आहे, अशा शब्दांत ‘आम्ही साहित्यप्रेमी’च्या कविसंमेलनात त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. धामणस्कर यांना…

error: Content is protected !!