खारेपाटण (प्रतिनिधी) : युवा संदेश प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या वतीने सन – २०२५ – २६ या शैशनिक वर्षी घेण्यात आलेल्या सिंधुरत्न टॅलेंट सर्च (STS) परीक्षा तसेच डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम अर्थात प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ च्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले असून या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
नुकताच या विद्यार्थ्यांचा शाळा व्यवस्थापन समिती जि.प. केंद्र शाळा खारेपाटण नं.१ च्या वतीने पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. या कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य गुरुप्रसाद शिंदे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मंगेश ब्रम्हदंडे, उपाध्यक्ष संध्या पोरे, माजी अध्यक्ष संतोष पाटणकर, प्राप्ती कट्टी, समिती सदस्य उमेश गुरव, शाळेच्या मुख्याध्यापिका आरती जोजन आदी मान्यवर उपस्थित होते.
एस. टी. एस व प्रज्ञाशोध परीक्षेत खारेपाटण केंद्र शाळेचे सुयश प्राप्त केलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे – कु.सांची संतोष पाटणकर, मानस उमेश गुरव (इयत्ता ६ वी), वेदांत प्रशांत झगडे, गुरुराज मंगेश ब्रम्हदंडे (इयत्ता ४ थी), स्वयंम हर्षल पोरे, चिरायू मिथुन शेंगाळे, वेदांत मंगेश तावडे (इयत्ता ३ री), कु.निर्जरा दीपक कांबळी, (इयत्ता २ री) या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा आयोजकांच्या वतीने प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरविण्यात आले. तसेच या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे व गुणवंत विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.









