Category बातम्या

समूह गीत गायन स्पर्धेमध्ये नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कुल नडगिवे चा डंका…..

खारेपाटण (प्रतिनिधी) : येथील आदर्श एज्यूकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कुल नडगिवे या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नेहमीच्या शिक्षणाबरोबरच संगीत कलेचे धडे देखील अत्यंत सफाईदारपणे गिरवले जातात याचे प्रत्यंतर म्हणून नुकत्याच वेताळ बांबर्डे शिक्षण प्रसारक मंडळ पणदूर यांच्यावतीने गुरुवर्य कै.…

चिंदरच्या कु. सोहम चिंदरकरला ‘कोकण स्तरीय गायन प्रेरणा गौरव पुरस्कार’!

सिंधुनगरी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान; गायन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल आचरा (प्रतिनिधी) : क्रांती दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पत्रकार संघ, मुंबई आणि कोकण बुक ऑफ रेकॉर्ड्स फाउंडेशन, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुनगरी येथील पत्रकार भवनात ‘कोकण कला साहित्य गौरव संमेलन,…

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देण्यासाठी उपक्रम सातत्याने सुरू ठेवणार : विशाल परब

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित तालुकास्तरीय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद वेंगुर्ला (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सांघिकता, शिस्त, संस्कार आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना रुजविण्यासोबतच त्यांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने विशाल परब मित्रमंडळ आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस…

समाजाच्या न्यायासाठी दोन चळवळींचे कार्यकर्ते उपोषणाच्या मैदानात

कणकवली (प्रतिनिधी) : १५ ऑगस्ट २०२६ | स्वातंत्र्याच्या ८० व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर कणकवली नगरपंचायत येथे समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी दोन सामाजिक चळवळींचे कार्यकर्ते बेमुदत उपोषणाला बसले आहेत. स्वातंत्र्याचा खरा अर्थ प्रत्येक कामगाराला न्याय, सन्मान आणि कायदेशीर हक्क मिळण्यात आहे, या…

फाळणीच्या वेदनादायी स्मृतींना उजाळा…

असंख्य निरपराधांच्या बलिदानाला विनम्र अभिवादन! बांदा (प्रतिनिधी) : भारताच्या इतिहासातील १४ ऑगस्ट १९४७ हा दिवस स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या देशासाठी जितका महत्त्वाचा होता, तितकाच तो वेदना, विस्थापन आणि मानवी शोकांतिकेचा काळ घेऊन आला. भारत-पाकिस्तान फाळणीच्या काळात लाखो कुटुंबे आपल्या मातृभूमी,…

देवघर धरण प्रकल्पग्रस्त एकनाथ चव्हाण यांच्या उपोषणाची पालकमंत्री नितेश राणेंकडून दखल

 प्रशासनाकडून प्रश्न सोडविण्याचे लेखी आश्वासन फोंडाघाट (प्रतिनिधी) : देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पांतर्गत नवीन कुर्ली येथे रस्त्यालगतचे गटाराचे बांधकामाचे काम करताना श्री.एकनाथ चव्हाण यांचा दुकान गाळा JCB ने तोडलेच्या निषेधार्थ , आणि गटाराचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणारे श्री. एकनाथ नारायण…

बोगस सही प्रकरणात ठेकेदारांवर कारवाई, मग संबंधित कर्मचाऱ्याला अभय का?; संदेश सावंत आक्रमक

१७ गावांचा पाणीप्रश्न, रखडलेली बिले अन् बोगस सही प्रकरणावरून बांधकाम समिती सभा तापली सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : बांधकाम कार्यकारी अभियंत्यांच्या खोट्या सह्या करून आर्थिक घोटाळा करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई झाली; मग याच प्रकरणाशी संबंधित कर्मचाऱ्यावर अद्याप कारवाई का नाही? असा थेट सवाल…

नवीन आर्थिक वर्षात वित्त विभागात एकही बिल प्रलंबित राहणार नाही : सभापती संतोष साटविलकर

निधी वेळेत खर्च करा; प्रत्येक विभागाने समन्वयाने काम करावे सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : नवीन आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेच्या कोणत्याही विभागाचे एकही बिल वित्त विभागात थांबणार नाही याची दक्षता घ्या .निधी वेळेत खर्च व्हावा या दृष्टीने समन्वयाने काम करा. प्रत्येक विभागाने याची…

टेनिस क्रिकेटमध्ये शुभम सावंत व जतिन हिर्लेकर यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड !

संचालक संदेश पटेल यांचे कडून विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षक आणि हायस्कूलचे अभिनंदन ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : टेनिस क्रिकेट वेल्फेअर असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग व टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने, कुडाळ येथे १७ वर्षांखालील विद्यार्थ्यांची निवड चाचणी घेण्यात आली. या…

वर्ष उलटले तरी गॅस कनेक्शन नाही

जामसंडे गॅस एजन्सीविरोधात स्वातंत्र्यदिनी उपोषणाचा शासकीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा इशारा देवगड (प्रतिनिधी) : आईच्या मृत्यूनंतर तिच्या नावे असलेले घरगुती गॅस कनेक्शन स्वतःच्या नावावर करण्याबाबत मागील वर्षभर गॅस एजन्सीच्या पायऱ्या झिजवूनही दाद न देता गॅस कनेक्शनपासून वंचित ठेवणाऱ्या जामसंडे येथील एच.पी. गॅस…

error: Content is protected !!