प्रशासनाकडून प्रश्न सोडविण्याचे लेखी आश्वासन
फोंडाघाट (प्रतिनिधी) : देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पांतर्गत नवीन कुर्ली येथे रस्त्यालगतचे गटाराचे बांधकामाचे काम करताना श्री.एकनाथ चव्हाण यांचा दुकान गाळा JCB ने तोडलेच्या निषेधार्थ , आणि गटाराचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणारे श्री. एकनाथ नारायण चव्हाण यांच्या मागणीची अखेर प्रशासनाने दखल घेतली आहे.
श्री. एकनाथ चव्हाण यांनी आपल्या दुकान गाळ्याबाबत निर्माण झालेला प्रश्न तसेच झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला होता.
याबाबत १४ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मा. पालकमंत्री नितेश राणे यांच्या समवेत चर्चा करण्यात आली. त्यानुसार कार्यकारी अभियंता आंबडपाल कुडाळ, यांनी याबाबत योग्य ती कार्यवाही व पूर्तता करणेबाबत लेखी आश्वासन दिल्यामुळे श्री. एकनाथ चव्हाण यांनी १५ ऑगस्ट रोजी होणारे उपोषण तूर्त स्थगित केले आहे.
परंतु आश्वासनाची पूर्तता नझाल्यास श्री. चव्हाण यांनी केव्हाही उपोषण करण्यात येईल असे लेखी कळविले आहे.











