खारेपाटण (प्रतिनिधी) : येथील आदर्श एज्यूकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कुल नडगिवे या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नेहमीच्या शिक्षणाबरोबरच संगीत कलेचे धडे देखील अत्यंत सफाईदारपणे गिरवले जातात याचे प्रत्यंतर म्हणून नुकत्याच वेताळ बांबर्डे शिक्षण प्रसारक मंडळ पणदूर यांच्यावतीने गुरुवर्य कै. शशिकांत अणावकर यांच्या जयंती निमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समूह गीत गायन स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकवला असून, विजय रावराणे व मित्रमंडळ वैभववाडी यांनी हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या आठव्या स्मृतिदिनांनिमित्त वैभववाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समूह गीत गायन स्पर्धेत खुल्या गटात तृतीय क्रमांक पटकवून प्रशालेला दुहेरी यश प्राप्त करून देत इतिहासात मानाचा तुरा खोवला आहे.
या समूह गीत गायन स्पर्धेत सहभागी सर्व यशस्वी विदयार्थ्यांना शाळेतील संगीत शिक्षक हेमंत तेली यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.तर मुलांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रघुवीर राणे व सर्व संस्था पदाधिकारी मुख्याध्यपिका नीलम डांगे व ग्रामस्थांनी अभिनंदन करून विजय रावराणे त्यांना पुढील वाटचालीला शुभेच्छा. दिल्या आहेत.
समूह गीत गायन स्पर्धेमध्ये नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कुल नडगिवे चा डंका…..










