Category मुंबई

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये; बिनशर्त प्रवेश केल्याची फडणवीसांची माहिती

ब्युरो न्युज (मुंबई) : काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी सोमवारी विधानसभा सदस्यत्वाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप मुंबईच्या कार्यालयात अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अशोक चव्हाण…

नितेश राणेंच्या सुरक्षेत वाढ, सरकारकडून वाय प्लस दर्जाची सुरक्षा

ब्युरो न्युज (मुंबई) : भाजप नेते नितेश राणे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांना सरकारडून वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. भाजप नेते नितेश राणे हे लँड जिहाद, लव जिहादच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत असतात. अशावेळी त्यांच्या जीवाला…

भास्कर जाधवला चोप देणार, मी असं कुणाला सोडत नाही – नारायण राणे

ब्युरो न्युज (मुंबई) : भाजपचे राज्यसभेचे खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. “कोण तरी भास्कर जाधव आणला भाडोत्री माझ्यावर टीका करण्यासाठी मी त्यांच्यावर काही बोलणार नाही. पण एक दिवस…

शरद पवार गटाला मिळालं नवं नाव

‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ ब्युरो न्युज (मुंबई) : शरद पवार गटाला नवं नाव मिळालंय. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ असं नवं नाव पवार गटाला मिळालंय. राज्यसभा निवडणुकीसाठी हे नवं नाव निवडणूक आयोगाकडून देण्यात आलंय. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानं निवडणूक आयोगाकडे नवीन…

रेल्वे भाजपाच्या बापाची आहे का? ठाकरेंच्या ‘वंदे भारत’ प्रवासावरुन नितेश राणे आणि संजय राऊत भिडले

ब्युरो न्युज (मुंबई ) : उद्धव ठाकरेंनी वंदे भारत रेल्वे मधून केलेल्या प्रवासाला भाजपाने टोला लगावला आहे. मोदींमुळे झालेल्या ट्रेनमधून उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी प्रवास केला असं म्हणत नितेश राणे यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून…

मनोज जरांगेंचे उपोषण मागे; मुख्यमंत्र्यांनी जरांगेंना लावला विजयी गुलाल

मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणप्रश्नी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. अखेर मनोज जरांगे पाटलांच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. मध्यरात्री तब्बल तीन तास चर्चा झाल्यानंतर सरकारने मनोज जरांगेच्या सर्व मागण्यांचे सुधारित अध्यादेश जारी करून त्यांच्या…

मराठा बांधवांच्या मदतीसाठी मुंबईतील डबेवाले सरसावले

मराठा बांधवांच्या जेवणाची सोय मुंबईतील डबेवाल्यांकडून करण्यात येणार मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात मराठा आंदोलनाचा प्रश्न चांगलाच तापला आहे. मराठ्यांचं वादळ आता मुंबईच्या वेशीवर धडकलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये येऊ नये यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.मात्र दुसरीकडे मनोज जरांगे…

सिंधू रनरनी गाजवली टाटा मुंबई मॅरेथॉन

मुंबई (प्रतिनिधी) : जगभरात प्रतिष्ठेची मानली जाणारी आणि धावपळीच्या जीवनात मुंबईकरांना आणि जगाला सुदृढ आरोग्याचा मार्ग दाखविणारी ‘टाटा मुंबई मॅरेथॉन २०२४’ ही स्पर्धा रविवार दिनांक २१ जानेवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आली होती. ‘हर दिल मुंबई’चा नारा देत हजारो मुंबईकर…

पात्रता असताना देखील स्वतःच्या मुलीला बाजूला ठेवले आणि कार्यकर्त्यांना संधी दिली : शरद पवार

बारामती (प्रतिनिधी) : “मला लोक सांगायचे ताई (सुप्रिया सुळे) तिसऱ्यादा निवडून आल्या असून, त्यांना संधी द्या. पण पात्रता असताना देखील स्वतःच्या मुलीला बाजूला ठेवले आणि कार्यकर्त्यांना संधी दिली. सलग आठवेळा संसदरत्न मिळाला. काहीना काही योगदान असेल ना?,असे म्हणत शरद पवारांनी…

केंद्र सरकार कडून 22 जानेवारीला संपूर्ण देशात अर्ध्या दिवसाच्या सुट्टीची घोषणा

ब्युरो न्युज (मुंबई) : केंद्र सरकारने 22 जानेवारीला संपूर्ण देशात अर्ध्या दिवसाच्या सुट्टीची घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. अयोध्या राम मंदिरातील प्राणप्ततिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. केंद्र सरकारने नोटिफिकेशन काढत…

error: Content is protected !!