ब्युरो न्युज (मुंबई ) : उद्धव ठाकरेंनी वंदे भारत रेल्वे मधून केलेल्या प्रवासाला भाजपाने टोला लगावला आहे. मोदींमुळे झालेल्या ट्रेनमधून उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी प्रवास केला असं म्हणत नितेश राणे यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून ‘रेल्वे ही भारतीय संपत्ती आहेभाजपाच्या बापाची आहे का’ ? असा थेट सवाल संजय राऊत यांनी केला. रेल्वे हे ब्रिटिशांनी निर्माण केली आणि काँग्रेसने वाढवली दोन-चार ट्रेन तुम्ही नवीन आणल्या ते तुमच्या मालकीच्या आहेत का? देश तुमच्या मालकीचा आहे का? रेल्वे या देशाची सार्वजनिक मालमत्ता आहे, भाजपवाले मूर्ख लोक असून त्यांना कौन्सिलिंग ची गरज आहे असा पलटवार संजय राऊत यांनी केला.