Category ओरोस

जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता कार्यशाळा आज शरद कृषी भवन येथे संपन्न

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : ग्रामपंचायतीनी शुध्द शाश्वत पाण्याचा पुरवठा करणे गरजेचे आहे. पाण्याचा दर्जा ग्रामपंचायतीनी राखल्यास ग्रामस्थ पाण्याचा वापर करुन १०० टक्के पाणीपट्टी हि भरणा होण्यास मदत होईल असे प्रतिपादन पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर यांनी केले.…

बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी चैतन्य उर्फ धावू महेश पाटीलचा जामीन नामंजूर

ओरोस (प्रतिनिधी) : अल्पवयीन पीडित युवतीवर बलात्कार करून तिला गरोदर केल्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी चैतन्य उर्फ धावू महेश पाटील ( वय 23 , रा.सटवाडी, आंबेगाव, ता. सावंतवाडी ) याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश डॉ सानिका जोशी यांनी फेटाळला.…

कसाल येथे रेल्वे स्टेशन मंजूर करण्यात यावे या मागणीसाठी कसाल रेल्वे स्थानक संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आले निवेदन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : कसाल येथे रेल्वे स्टेशन मंजूर करण्यात यावे. अशा मागणीचे १३५० ग्रामस्थांच्या सहीचे पत्र तसेच कसाल ग्रामपंचायत ग्रामसभेचा ठराव सहित कसाल येथे रेल्वे स्टेशन मंजूर व्हावे अशी मागणी कसाल रेल्वे स्थानक संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याकडे…

महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाच्या निमित्ताने मनीष कोल्हटकर करण्यात आला सत्कार

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाच्या निमित्ताने ओरोस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष कोल्हटकर यांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन परब ज्ञाती बांधवांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी भेटी दरम्यान सुशील परब म्हणाले, पोलीस प्रशासनात आपल्या कुटुंबातील व्यक्ती नोकरीला लागतो.…

३१ जानेवारी रोजी जिल्ह्यातील पत्रकारांसाठी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

ओरोस (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील पत्रकारांना क्रिकेटच्या माध्यमातून एकत्र येवून एक दिवस आनंद लुटता यावा यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वप्रथम जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाने ‘ पत्रकारांची क्रिकेट स्पर्धा ‘ भरवण्याची संकल्पना सुरू करत ती यशस्वी केली. त्याच संकल्पनेनुसार मुख्यालय पत्रकार संघाच्यावतीने सिंधुदुर्गनगरी…

ओरोस येथील श्री देव रवळनाथ मंदिर येथे बांधकाम कामगारांचा भव्य मेळाव्याचे आयोजन

७ जानेवारी रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत होणार मेळावा ओरोस (प्रतिनिधी) : बांधकाम कामगारांचा भव्य मेळावा रविवार ७ जानेवारी रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत सिंधुदुर्गनगरी ओरोस येथील श्री देव रवळनाथ मंदिर येथे आयोजित करण्यात…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या डाटा सेंटरला ISO मानांकन प्राप्त

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेच्या डाटा सेंटरला ISO 27001:2013 चे मानांकन प्राप्त झाले असुन बँकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. बँकेच्या संवेदवनशील माहितीचे प्रभावी व योग्य पद्धतीने व्यवस्थापन करण्यासाठी व त्यात नियमितता राहाण्यासाठी ISO…

कसाल येथे रेल्वे स्टेशन व्हावे यासाठी गेली ३० वर्ष प्रयत्न सुरू

रेल्वे स्टेशन जो पर्यंत होत नाही तोपर्यंत आपण संघर्ष करत राहू – संतोष तथा बाळा कांदळकर सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : कोंकण रेल्वेच्या पहिल्या सर्व्हेत कसाल येथे रेल्वे स्टेशन होते. कोंकण रेल्वेच्या माध्यमातून काढलेल्या कॅलेंडर मध्ये कसाल रेल्वे स्टेशन दाखवण्यात आले होते.…

भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा यांच्या माध्यमातून “रत्नसिंधू जॉब फेअर २०२४” रोजगार मेळाव्याचे आयोजन

१२ जानेवारी सावंतवाडी जिमखाना मैदानावर रोजगार मेळाव्याचे आयोजन ओरोस (प्रतिनिधी) : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना नोकरी देण्यासाठी भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा यांच्या माध्यमातून १२ जानेवारी २०२४ रोजी स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त युवा दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी…

कसाल वझरेवाडी येथील लक्ष्मी नारायण गावडे यांचे निधन

ओरोस (प्रतिनिधी): कसाल वझरेवाडी येथे राहणाऱ्या लक्ष्मी नारायण गावडे (वय ८१) यांचे त्यांच्या राहत्या घरी मंगळवारी पहाटे दोन वाजता निधन झाले. त्या पत्रकार रवी गावडे यांच्या मातोश्री होत्या. तर कसाल ज्येष्ठ नागरिक संघाचे निर्माते नारायण गावडे यांच्या पत्नी होत्या. कसाल…

error: Content is protected !!