बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी चैतन्य उर्फ धावू महेश पाटीलचा जामीन नामंजूर

ओरोस (प्रतिनिधी) : अल्पवयीन पीडित युवतीवर बलात्कार करून तिला गरोदर केल्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी चैतन्य उर्फ धावू महेश पाटील ( वय 23 , रा.सटवाडी, आंबेगाव, ता. सावंतवाडी ) याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश डॉ सानिका जोशी यांनी फेटाळला. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील रुपेश देसाई यांनी युक्तिवाद केला. आरोपी चैतन्य पाटील याने पीडित अल्पवयीन युवतीवर 1 ऑगस्ट 2022 ते 31 मार्च 2023 दरम्यान पीडितेची संमती नसताना वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यातून पीडित युवती गर्भवती राहिली. 20 डिसेंबर रोजी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी चैतन्य उर्फ धावू महेश पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आली होती. दरम्यान पीडित युवतीची 19 डिसेंबर 2023 रोजी प्रसूती होऊन तिला मुलगी झाली आहे. या गुन्ह्यात जामीन साठी आरोपीने दाखल केलेल्या अर्जाला सरकारी वकील रुपेश देसाई यांनी हरकत घेतली. आरोपीला जामीन मंजूर झाल्यास तो पीडित युवती व तिच्या नवजात अपत्यास गंभीर इजा करू शकतो, फिर्यादी पीडितेबाबत दखलपात्र गंभीर गुन्हा करू शकतो, फिर्यादी चे आईवडील घरी नसताना आरोपीने जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार करण्याचा गंभीर गुन्हा केला आहे, आरोपी साक्षीदार व फिर्यादीवर दबाव आणू शकतो, आरोपिविरोधात सबळ पुरावे उपलब्ध असून तो पलायन करू शकतो, त्याला कायद्याचा धाक राहणार नाही हे मुद्दे सरकारी वकील रुपेश देसाई यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. सरकारी वकील देसाई यांच्या युक्तिवादा नंतर जिल्हा न्यायाधीश डॉ जोशी यांनी आरोपी चा जामीन फेटाळला.

error: Content is protected !!