भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा यांच्या माध्यमातून “रत्नसिंधू जॉब फेअर २०२४” रोजगार मेळाव्याचे आयोजन

१२ जानेवारी सावंतवाडी जिमखाना मैदानावर रोजगार मेळाव्याचे आयोजन

ओरोस (प्रतिनिधी) : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना नोकरी देण्यासाठी भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा यांच्या माध्यमातून १२ जानेवारी २०२४ रोजी स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त युवा दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी जिमखाना मैदानावर एक दिवसाचा “रत्नसिंधू जॉब फेअर २०२४” या भव्यदिव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी दिली.

केंद्रीय लघु, सूक्ष्म, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, प्रदेश सचिव निलेश राणे, आ नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा रोजगार मेळावा होणार असून यामध्ये गोवा, नवी मुंबई आणि पुणे येथील १२० कंपन्या सहभागी होणार आहे. यावेळी सहभागी सर्व तरुणांना नोकरी देण्याचा प्रयत्न राहणार असून नोकरी न मिळालेल्या तरुणांना पुढील सहा महिन्यांचे जॉब कार्ड दिले जाणार आहे. या कालावधीत सबंधित कंपन्या तरुणांच्या मोबाईलवर मॅसेज पाठवून रिक्त पदांची माहिती देणार आहे, असेही यावेळी विशाल परब यांनी सांगितले. यासाठी स्वतंत्र वेबसाईट तयार करण्यात आली असून क्यू आर कोड सुद्धा तयार करण्यात आला आहे. त्यावर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सिंधुदुर्गनगरी येथील भाजपच्या जिल्हा कार्यालयात पत्रकार परिषद घेवून हो माहिती देण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजू परब, प्रकाश मोर्ये, प्रितेश राऊळ, दीपक पवार, किरण रहाणे आदी उपस्थित होते. या मेळाव्यात पाचवी ते पदवीधर झालेले बेरोजगार सहभागी होवू शकणार आहेत. तसेच त्याच दिवशी पात्र ठरणाऱ्या बेरोजगारांना नियुक्ती पत्र देण्यात येणार आहे. दीव्यांग व्यक्तींना यामध्ये प्राधान्य राहणार आहे.

error: Content is protected !!