देवगड (प्रतिनिधी) : शिवप्रतिष्ठान फणसे, मुंबई मंडळाच्या वतीने ९ जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.तालुक्यातील मालवण येथील जीवन शिक्षा विद्या मंदिर-कोळंब, जिल्हा परिषद शाळा कातवड ,खैदा, निव्हे-कांदळगाव तसेच बांदिवडे गावातील पालयेवाडी, पवारवाडी,खोरवाडी, मळावाडी आणि कोईळ अश्या एकूण ९ जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे (दप्तर, वह्या,कलर बॉक्स, चित्रकला पुस्तक व कंपास मधील साहित्य) वाटप करण्यात आले.
याप्रसंगी शिवप्रतिष्ठान फणसे, मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री महेश दांडेकर, उपाध्यक्ष प्रमोद लाळये, सरचिटणीस-गणेश (बबलू) गांवकर, खजिनदार- तुषार गांवकर, सदस्य विश्वनाथ गांवकर, दिनेश फणसेकर, रणजित परकर, रुपेश फाटक, संजय कांबळी तसेच कोळंब आणि बांदिवडे ग्रामपंचायतीचे सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षणाधिकारी, विद्यार्थी पालकवर्ग आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
शिवप्रतिष्ठान फणसे मंडळाच्या वतीने वर्ष २०१८ पासून ते वर्ष २०२३ पर्यंत संलग्न ६ वर्ष जिल्हा परिषदेच्या २२ शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहेत त्याबद्दल मंडळाचे वर्गणीदार, देणगीदार व हितचिंतक यांचे शिवप्रतिष्ठान फणसे,मुंबई मंडळातर्फे आभार व्यक्त करण्यात आले.