मोदी @ 9 अभियान अंतर्गत हर घर संपर्क अभियानाचा लोरे नं 1 मध्ये शुभारंभ

कणकवली विधानसभा मतदारसंघात हर घर संपर्क अभियानाला सुरुवात

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील लोरे नं.१ येथे मोठ्या उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर,जिल्हा संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती,सिंधुदुर्ग तुळशीदास रावराणे,कणकवली विधानसभा संयोजक मनोज रावराणे आदी मान्यवर उपस्थित होते.

मोदी सरकारच्या नऊ वर्षातील गौरवशाली कामगिरीचा लेखाजोखा असलेल्या पुस्तिकेचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. प्रत्येक बुथवरील बूथ समितीच्या सदस्यांनी बुथमधील घरे विभागून घेऊन त्या त्या घरात जात नागरिकांशी संपर्क करावा.आणि 9090902024 या नंबरद्वारे मोदीं सरकारच्या कामगिरीसाठी समर्थन द्यावे असे आवाहन करावे,असे या अभियानाचे स्वरूप आहे.

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजन चीके,भाजपा तालुका अध्यक्ष संतोष कानडे,दिलीप तळेकर,रवी पाळेकर,प्रकाश पारकर, पंढरीनाथ वायंगणकर, दामोदर नारकर,लोरे सरपंच अजय रावराणे, घोणसरी सरपंच मॅक्सी पिंटो, कोंडये सरपंच ऋतुराज तेंडुलकर,लोरे उपसरपंच सुमन गुरव, शक्तिकेंद्र प्रमुख आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!