कणकवली (प्रतिनिधी) : दहावीचा रिझल्ट लागला आणि मुलांना वेध लागले ते अकरावीच्या प्रवेशाचे.नियमित प्रवेश प्रक्रिया संपून आज 28 जून 2023 रोजी 2023 – 24 च्या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता अकरावीचे वर्ग सुरू झाले. यानिमित्ताने पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागताचा आणि शुभेच्छांचा समारंभ एस एम ज्युनिअर कॉलेजमध्ये उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात इयत्ता अकरावीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.कॉलेजचे प्राचार्य श्री जी एन बोडके यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करुन शुभेच्छाही दिल्या त्याचबरोबर कॉलेजची शिस्त आणि गुणवत्ता याबद्दल मार्गदर्शन केले.तसेच कणकवली शिक्षण संस्था कणकवलीचे सचिव मा. श्री डी एम नलावडे साहेब यांनी विद्यार्थ्यांना सध्याच्या जगात वावरताना घ्यावयाची काळजी, यशस्वी होण्यासाठी घ्यावे लागणारे कष्ट, जिद्द, चिकाटी याबद्दल मार्गदर्शन केले, तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला उपप्राचार्य श्री आर एल प्रधान व जुनिअर कॉलेजचे सर्व प्राध्यापक उपस्थित होते.पर्यवेक्षक श्री. जी ए कदम यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ एम आर पाटील यांनी केले.