कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली मधलीवाडी-घाडीवाडी येथील महादेव कृष्णा घाडीगांवकर (८३) यांचे सोमवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. गेली अनेक वर्ष त्यांनी श्री देव गांगो मंदिर येथे पुजारी म्हणून काम केले. महादेव घाडीगांवकर यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलगे, सूना, नातवंडे, वहिनी, पुतणे असा मोठा परिवार आहे. संजय व मंगेश घाडीगांवकर यांचे ते वडील होत. महादेव घाडीगावकर यांच्या निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
कणकवली मधलीवाडी-घाडीवाडी येथील महादेव कृष्णा घाडीगांवकर यांचे वृद्धापकाळाने निधन











