खूनाच्या गुन्ह्यात आरोपी सिद्धिविनायक पेडणेकर ला न्यायालयीन कोठडी

कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई पोलीस दलातील स्वेच्छा सेवानिवृत्त जमादार विनोद आचरेकर यांना जीवे ठार मारल्याच्या गुन्ह्यातील आरोपी सिद्धिविनायक पेडणेकर याला कणकवली दिवाणी न्यायालयाने 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली. मुंबई पोलिस दलातील स्वेच्छा सेवानिवृत्त साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनोद आचरेकर यांचा त्यांच्या आत्येभावाचा मुलगा सिद्धिविनायक याने 27 नोव्हेंबर रोजी रात्री साडे अकरा वाजता कुदळी च्या प्रहाराने डोके फोडून खून केला होता. या गुन्ह्यात आरोपी सिद्धिविनायक याला 28 नोव्हेंबर रोजी कणकवली पोलिसांनी अटक केली होती. आरोपी सिद्धिविनायक याला 29 नोव्हेंबर रोजी न्यायालयाने 5 दिवस पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडी ची मुदत संपल्याने आरोपी पेडणेकर याला तपासी अधिकारी मारुती जगताप यांनी आज कणकवली दिवाणी न्यायालयासमोर हजर करत दोन दिवस वाढीव पोलीस कोठडीची मागणी केली. मात्र न्यायाधीश ताजुद्दीन शेख यांनी आरोपी पेडणेकर याला 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली. आरोपी पेडणेकर याला सावंतवाडी जेलमध्ये रवाना करण्यात आले.

error: Content is protected !!