असलदेत 5 शेळ्या विजतारांच्या स्पर्शाने गतप्राण ; मितेश डामरे यांचे 40 हजारांचे नुकसान

कणकवली (प्रतिनिधी) : असलदे डामरेवाडी येथे विज तारांचा स्पर्श होवून ५ शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना काल सायंकाळी उशिरा घडली. यात शेतकरी मितेश मंगेश डामरे यांचे अंदाजे ४० हजाराचे नुकसान झाले आहे. दरम्यान संबंधित प्रकाराला विज वितरण कंपनीचा हेळसांडपणा जबाबदार आहे. त्यामुळे त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्याला भरपाई देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडुन करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर विज कंपनीचे अधिकारी पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी भेट दिली. दरम्यान यावेळी सरपंच चंद्रकात डामरे, उपसरपंच सचिन परब, पोलिस पाटील सावित्री पाताडे, मिलींद तांबे आदींनी त्या ठिकाणी धाव घेवून मदतकार्यात सहभाग घेतला.

error: Content is protected !!