वेंगुर्ला (प्रतिनिधी) : सिधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनात भर टाकणारा तसेच वेंगुर्ल्यातील वाढत्या पर्यटनासाठी फायदेशीर ठरणारा बहुचर्चित झुलत्या पुलाचे काम आता पूर्ण झाले हे पुल पर्यटकांना आकर्षित करीत आहे. हे पुल अधिकृत पर्यटनासाठी सुरु झाले नसले तरी सध्या याचे व्हिडीओ, फोटो सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
तत्कालीन पालकमंत्री व आताचे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पाच सहा वर्षांपूर्वी या झुलत्या पुलासाठी निधी मंजूर केला होता. पर्यटन विषयक काही मुख्य प्रकल्पांपैकी दीपक केसरकर यांच्या समृद्ध कोकण या व्हीजनमधील वेंगुर्ल्यातील हे झुलते पुल होते. मात्र, काही तांत्रिक कारणामुळे हे पुल बरीच वर्षे रखडले होते. अनेकांनी यावरुन तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यावर वारंवार टीका केली होती. दरम्यान, आता महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर
केसरकर यांनी पुलाच्या कामाला अधिक गती दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अनामिका यांनीही या कामाकडे विशेष लक्ष देऊन संपुर्ण टीमच्या माध्यमातून हे काम मार्गी लावले. गेली चार वर्ष रखडलेल्या या कामाला खऱ्या अर्थाने अनामिका चव्हाण यांनी येथील कार्यकारी अभियंतां पदाचा पदभार स्वीकारताच चालना दिली.
अरबी समुद्र व मांडवी खाडीच्या संगमावर हे झुलते पुल असून याकडे पर्यटक आकर्षीत होत आहे. नव्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून उभारण्यात आलेले हे झुलते पूल सिंधुदुर्गातील पहिलेच फुल आहे. त्यामुळे या फुलावर सेल्फी फोटो घेण्याचा मोह होणारच आवरत नाही प्री-वेडिंग साठी या फुलाला वाढती पसंती आहे सद्यस्थितीत एक प्रकारचे आकर्षणच हे फुल ठरले आहे दुसरीकडे या झुलत्या पुलामुळे वेंगुर्ला बंदर ठिकाणी येणाऱ्या पर्यटक काही मिनिटात नजीकच्या नवाबाग आणि सागर तीर्थ किनाऱ्यावर काही मिनिटात पाई चालत जाऊ शकतो. पूर्वी नवाबाग तसेच सागर तीर्थ किनाऱ्यावर जाण्यासाठी पुन्हा एकदा शहरातूनच काही किलोमीटरचे अंतर कापून जावे लागत होते परंतु आता या झुलत्या फुलामुळे वेळ आणि खर्च वाचणार आहे. वेंगुर्ले शहराच्या पर्यटनामध्ये या झुलत्या फुलामुळे एक वेगळेपण निर्माण झाले आहे याचे श्रेय सर्वस्वी राज्याचे शालेय मंत्री श्री .केसरकर यांनाच जाते. सध्या पर्यटनाचा हंगाम जोरदार सुरु असल्याने शांत व सुरक्षित पर्यटनासाठी अनेक पर्यटक सिधुदुर्ग जिल्ह्यात येत आहे. सध्या वेंगुर्ल्याच्या पर्यटनाच्यादृष्टीने गतिमान विकास होत आहे. यात हे पूल मैलाचा दगड ठरेल यात शंका नाही.