शंकर पार्सेकर यांचा ठाकरे शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र

कणकवली (प्रतिनिधी) : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे वाशीम विधानसभा संपर्कप्रमुख तथा कणकवली तालुका संपर्कप्रमुख शंकर पार्सेकर यांनी उ बा ठा सेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. कणकवली तालुक्यातील शिरवल गावचे सुपुत्र असलेले शंकर पार्सेकर हे थेट मातोश्रीवर संपर्क असलेले शिवसैनिक म्हणून परिचित आहेत.गेली 35 वर्षे शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेल्या पार्सेकर यांच्याकडे पक्षश्रेष्टीं कडून दुर्लक्ष केले जात होते. त्यामुळेच वरिष्ठ नेते कोणतीही दखल घेत नसल्याने शंकर पार्सेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत पक्षालाही सोडचिट्ठी दिली आहे. दरम्यान अलीकडच्या काही दिवसांत पार्सेकर हे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते उदय सामंत तसेच सिंधुरत्न समिती सदस्य किरण उर्फ भैयाशेठ सामंत यांच्या संपर्कात असल्याचेही दिसून आले होते. त्यामुळे पार्सेकर पुढील राजकीय पावले काय उचलतात याची कणकवली तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्सुकता आहे.

error: Content is protected !!