देवगड अर्बन बँकेवर भाजपा राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोधकांना व्हाईट वॉश
सिंधुदुर्गात भाजपा- राष्ट्रवादी काँग्रेस युतीचा उदय
देवगड (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणेंचा करिश्मा पुन्हा एकदा कामयाब झाला असून देवगड अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेवर आ.नितेश राणे- नंदूशेठ घाटे यांच्या माध्यमातून भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवम पॅनल ने एकहाती सत्ता मिळवली आहे.शिवम पॅनल चे 13 पैकी 13 संचालक निवडून आले आहेत.
देवगड अर्बन को ऑपरेटीव्ह बँकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा पुरस्कृत शिवम सहकार पॅनेलने पुन्हा वर्चस्व प्रस्थापित केले असून बाराही जागा जिंकत शिवसेना व काँग्रेस पुरस्कृत सहकार समृध्दी पॅनलचा धुव्वा उडविला आहे.
देवगड अर्बन बँकेची निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा पुरस्कृत शिवम पॅनल व शिवसेना काँग्रेस पुरस्कृत सहकार समृध्दी पॅनल या दोन पॅनलमध्ये झाली.ही निवडणुक प्रतिष्ठेची झाली.या निवडणुकिमध्ये एकूण १३ जागांपैकी एक जागा बिनविरोध झाली होती तर उर्वरीत १२ जागांसाठी रविवारी मतदान झाले होते.सोमवारी अर्बन बँक कार्यालयात मतमोजणी पार पडली. यामध्ये बाराही जागांवर शिवम पॅनलचे उमेदवार विजयी झाले.
शिवम सहकार पॅनलमधून विजयी झालेले उमेदवार
सर्वसाधारण गटातून सदाशिव ओगले (१९४५), प्रकाश राणे (१८०८), अभय बापट(१९४३), अॅड.अभिषेक गोगटे(१९३६), डॉ.अमोल तेली(१८४३), दिनेश नंदकुमार घाटे(२०७२), समीर पेडणेकर(१९३१), महिला राखीव गटातून वैशाली तोडणकर(१९७७), ललिता शेडगे(१९३८) इतर मागास प्रवर्ग गटातून महादेव ऊर्फ बाबा आचरेकर(२१७५), अनु.जाती/जमाती गटातून सुरेंद्र चव्हाण(२१४३), भटक्या विमुक्त जाती/जमाती व विशेष मागास प्रवर्ग गटातून संजय बांदेकर(२१०९) हे उमेदवार विजयी झाले.तर या पॅनलचे सर्वसाधारण गटातील देवगड तालुक्याबाहेरील उमेदवार अनिल ऊर्फ बंड्या सावंत हे बिनविरोध निवडून आले.
सहकार समृध्दी पॅनलमधील उमेदवारांना मिळालेली
सर्वसाधारण गटातून अब्दुल रशिद अली खान(९९७), उल्हास मणचेकर(११५४), संतोष तारी(११३१), किरण टेंबुलकर(१०२७),रघुवीर वायंगणकर(९५७), महिला राखीव गटातून विशाखा मांजरेकर(१२०२), सुगंधा साटम(९७६), इतर मागास प्रवर्ग गटातून मनोज पारकर(१००३), अनु.जाती/जमाती गटातून सुरेश देवगडकर(१०४४), भटक्या विमुक्त जाती/जमाती व विशेष मागास प्रवर्ग गटातून धनंजय जोशी(१०७२) मते मिळाली.
निकाल जाहीर झाल्यानंतर शिवम पॅनलच्या कार्यकर्त्यांनी फाटाके वाजवून जल्लोष साजरा केला शिवम पॅनलचे सर्वेसेवा नंदकुमार घाटे, माजी आमदार अॅड.अजित गोगटे, जिल्हा बँक संचालक अॅड.प्रकाश बोडस, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाळा खडपे, माजी चेअरमन भाई आचरेकर यांनी विजयी उमेदवारांचे पुष्पहार घालून अभिनंदन केले.यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, मुकूंद फाटक, महिला तालुकाध्यक्षा उष:कला केळूसकर, माजी जि.प.सदस्या सावी लोके, माजी नगराध्यक्षा प्रियांका साळसकर, भाजयुमो शहरअध्यक्ष दयानंद पाटील, नगरसेवक शरद ठुकरूल, नगरसेव{का प्रणाली माने, तन्वी चांदोस्कर, प्रकाश गोगटे, शरद शिंदे, मंगेश लोके, निलेश पेडणेकर, नागेश आचरेकर आदी उपस्थित होते.
निवडणुकीसाठी माणिक सांगळे हे निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून तर सहाय्यक निबंधक देवगड अनिल राहीज व उमिर्ला यादव यांनी सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहीले.