सेवानिवृत्त झालेल्या पाेलिस कर्मचाऱ्याची हत्या

कोळोशी वरचीवाडी येथील घटना ; एक संशयित पाेलिसांच्या ताब्यात

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील कोळोशी वरचीवाडी येथे सेवानिवृत्ती घेतलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची हत्या झाली आहे. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला. विनोद मधुकर आचरेकर (वय ५५) असे त्यांचे नाव आहे. विनोद आचरेकर यांनी नुकतीच मुंबई पोलीस खात्यामधून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यानंतर गेले दोन दिवस ते एकटेच आपल्या कोळोशी वरचीवाडी येथील घरी राहण्यास आले होते. आज सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला.

दरम्यान त्यांच्या डोक्यावर मोठ्या जखमा दिसून आल्या आहेत. श्री. आचरेकर यांच्या मृत्यूची माहिती पोलीस पाटील संजय गोरुले यांनी कणकवली पोलिसांना दिली. त्यानंतर कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून एका संशयिताला ताब्यात घेतले असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. तर या घटनेचा अधिक तपास कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हडळ करत आहेत.याप्रकरणी अद्याप ठोस माहिती समोर आली नसती तरी पोलिसांकडून या घटनेप्रकरणी तपासाची वेगवान चक्रे फिरवली जात आहेत.

error: Content is protected !!