उमेश तोरसकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी फेरनिवड

बाळ खडपकर यांची जिल्हा सचिवपदी निवड

सिंधुनगरी (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघांच्या शुक्रवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सन २०२४ ते २०२६ या दोन वर्षांसाठी बिनविरोध कार्यकारणी निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी उमेश तोरसकर यांची फेरनिवड करण्यात आली असून सचिवपदी बाळ खडपकर यांची वर्णी लागली आहे. नव्या कार्यकारणीत उपाध्यक्ष म्हणून विद्याधर उर्फ बंटी केनवडेकर, संतोष राऊळ, आनंद लोके, किशोर जैतापकर यांची निवड करण्यात आली आहे. तर अखिल मराठी पत्रकार परिषद या राज्यस्तरीय संघटनेच्या प्रतिनिधीपदी गणेश जेठे यांचीही बिनविरोध निवड झाली.सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा सिंधुदुर्गनगरी येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवनात संपन्न झाली. या सभेत नवीन कार्यकारणी सर्वानुमते निवडण्यात आली. यामध्ये अध्यक्ष उमेश तोरसकर, सचिव बाळ खडपकर, उपाध्यक्ष आनंद लोके, बंटी उर्फ विद्याधर केनवडेकर, संतोष राऊळ, किशोर जैतापकर, खजिनदार संतोष सावंत, महेश सरनाईक (एक एक वर्ष विभागून), सहसचिव प्रवीण मांजरेकर, कार्यकारणी सदस्य राजन नाईक कुडाळ, लवू महाडेश्वर सिंधुनगरी, लक्ष्मीकांत भावे कणकवली, अमित खोत मालवण, प्रशांत वाडेकर देवगड, महेंद्र मातोंडकर वेंगुर्ला, सुहास देसाई दोडामार्ग व निमंत्रित सदस्य म्हणून देवयानी वरसकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सभेच्या सुरुवातीला पत्रकार तसेच पत्रकारांच्यादिवंगत नातेवाइकांना श्रद्धांजली वाहण्यातआली. तर समाजात विविध क्षेत्रात काम करणाऱ्यापत्रकारांचा अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. यासभेत वार्षिक जमा खर्च तसेच इतिवृत्ताला मंजुरीदेण्यात आली. पत्रकार भवनाच्या सर्वकामकाजाचा आढावा या सभेत घेण्यात आला.जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून जिल्हा पत्रकार संघाने तातडीने करारनामा पूर्ण करून घ्यावा. पत्रकार भवनाचे उत्पन्न व येणारा खर्च यावर लक्ष द्यावे अशा सूचना सभासदांनी केल्या. यावेळी रमेश जोगळे, अजित सावंत, भगवान लोके, प्रकाश काळे, महेश रावराणे, महेश सरनाईक, राजू तावडे, अयोध्याप्रसाद गावकर, राजू मुंबरकर, लखू खरवत, एकनाथ पवार, हरिश्चंद्र पवार, दाजी नाईक, मंगल कामत, विजय देसाई, संदीप गावडे, नंदकुमार आयरे, संतोष गावडे, प्रमोद म्हाडगुत, मनोज चव्हाण, वैशाली खानोलकर, मंगल कामत, नंदू कोरगावकर आदी पत्रकार सभासदानी उपस्थित राहत चर्चेवेळी व कार्यकारणी निवडीत सहभाग घेतला.ही सभा सुरळीत व शांततेत संपन्न झाली. या सभेला ज्येष्ठ पत्रकार गजानन नाईक, माधव कदम, संपादक संतोष वायंगणकर, अण्णा केसरकर, संपादक संदीप देसाई, नंदकिशोर महाजन, हेमंत कुलकर्णी, अभिमन्यू लोंढे, एकनाथ पवार, संतोष कुलकर्णी, प्रमोद ठाकूर, रवी गावडे यांच्यासह अन्य पत्रकार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!