कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक

सावंतवाडी तालुक्यात 97.01% मतदान

सावंतवाडी (प्रतिनिधी) : कोकण विभागीय पदवीधर शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी सावंतवाडी तालुक्यात उस्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला तालुक्यात 97.01 % इतके मतदान झाले एकुण 469 मतदारांपैकी 455 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

या निवडणुकीसाठी सावंतवाडी मळेवाड व बांदा अशी तीन मतदान केंद्र होती प्रत्येक केंद्रावर सकाळी आठ वाजल्यापासून मतदारांची व पक्षीय पदाधिकाऱ्यांची गर्दी दिसून येत होती. सावंतवाडी मतदान केंद्र तहसील कार्यालयात ठेवण्यात आले होते या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ही त्यांना ठेवण्यात आला होता. मतदान केंद्राच्या बाहेर दोन्ही उमेदवाराच्या पदाधिकाऱ्यांकडून बुथ लावण्यात आला होता. दुपारपर्यंत मतदानासाठी येथील केंद्रावर गर्दी पाहायला मिळाली सायंकाळ नंतर अधून मधून मतदार मतदानासाठी दाखल होत होते. काही बाहेरच्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी खास व्यवस्था ही करण्यात आली होती आधार कार्ड वरील पत्त्यामुळे काहींना सावंतवाडीतही मतदानासाठी यावे लागले. त्यासाठी उमेदवाराकडून वेगळीच फिल्डिंग लावण्यात आली होती.

त्यांनी मतदान केंद्रावरील आकडा लक्षात घेता सावंतवाडी मतदान केंद्रावर 97 स्त्री तर 220 पुरुषांनी असे एकूण 317 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला मळेवाडी केंद्रावर 18 स्त्री व 33 पुरुष असे 51 मतदारांनी मतदान केले तर बांधा केंद्रावर 33 स्त्री व 54 पुरुष असे 87 मतदाराने मतदानाचा हक्क बजावला एकूण 455 जणांनी तालुक्यात मतदान केले. मळेवाड वगळता सावंतवाडी मतदान केंद्रावर नऊ मतदार अनुपस्थित राहिले तर बांधा केंद्रावर पाच मतदार अनुपस्थित राहिले एकूण 14 मतदारांनी निवडणुकीकडे पाठ फिरवली. दिवसभरात कुठलाही अनुचित प्रकार न घडता शांततेत मतदान पार पडले.
या निवडणुकीत भाजप व बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे विरुद्ध महाविकास आघाडीचे बाळाराम पाटील यांच्या चुरास आहे. दिवसभर दोन्ही पक्षांचे पदाधिकारी नेते मतदान केंद्रावर ठाण म्हणून होते यात भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली जिल्हा प्रवक्ते संजू परब, जिल्हा उपाध्यक्ष मनोज नाईक, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी तालुकाप्रमुख नारायण राणे,तर महाविकास आघाडीचे काका मांजरेकर काँग्रेस नेते विकास सावंत आधी तर शिक्षक भारती शिक्षक परिषद मुख्याध्यापक संघ आदींचे पदाधिकारी कार्यकर्तेही आपापल्या उमेदवाराच्या समर्थनार्थ दिसत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!