कोकण पदवीधर निवडणुकीसाठी जिल्ह्यात ९७.४१ टक्के

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : कोकण विभाग शिक्षक मतदार संघासाठी जिल्ह्यातील १९ मतदान केंद्रांवर आज मतदान प्रक्रिया पार पडली. २१६४ मतदारांपैकी २१०८ मतदारांनी मतदान केल्याने एकूण ९७.४१ टक्के मतदान झाले. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. २ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.

सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानासाठी ईव्हीएम मशीन न वापरता जुन्या पद्धतीने अर्थात मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्यात आले. यासाठी ८ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्यात खरी चुरस पहायला मिळाली. कोकण विभाग शिक्षक मतदार संघात ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग अशा ५ जिल्ह्यांचा समावेश आहे.

error: Content is protected !!