वेंगुर्ले (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील दुर्घटनेमुळे तसेच जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पडझड होऊन गोरगरीब जनतेचे नुकसान झाले असल्याने, माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा वाढदिवस कोणताही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित न करता विविध सेवा – उपक्रम २५ जुलै रोजी आयोजित करून ” सेवादिन ” साजरा करण्यात येणार आहे .
शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सत्कार वेंगुर्ले तालुक्यातील वजराठ नं १ शाळेने शिष्यवृत्ती परीक्षेत ऐतिहासिक कामगिरी बजावली असून ग्रामीण भागातील यावर्षी ७ विद्यार्थी राष्ट्रीय आणि राज्य गुणवत्ता यादीत चमकुन शिष्यवृत्तीधारक बनले आहेत. त्या विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच त्यांना शिकविणारे शिक्षक यांचाही सत्कार करण्यात येणार आहे.वेंगुर्ले शहरातील ग्रामदैवत रामेश्वर मंदिर, सातेरी मंदिर, हनुमान मंदिर, स्वामी समर्थ मंदिर येथे बरेच फुल विक्रेते पावसात फुलविक्री करत असतात, अशा फुल विक्रेत्यांना पावसा पासून संरक्षक मिळण्यासाठी मोठ्या छत्र्या देण्यात येणार आहेत.अशी माहीती जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई व तालुक्याध्यक्ष सुहास गवंडळकर यांनी दिली.