वैभववाडीत स्टॉल धारकांचे उपोषण सुरूच, नगरपंचायत प्रशासन व स्टॉल धारक आपापल्या भुमिकेवर ठाम
वैभववाडी (प्रतिनिधी): गेल्या काही दिवसांपासून वैभववाडी शहरात स्टॉल धारकांचे उपोषण सुरू आहे. वैभववाडी शहरातील व शहरा लगतच्या गावातील अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह गेली कित्येक वर्षे स्टॉलवरील व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे स्टॉल धारकांच्या पुनवर्सनाची लेखी हमी नगरपंचायत प्रशासनाकडून मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी स्टॉल धारकांची ठाम भूमिका आहे. तर सदरच्या अतिक्रमणाबाबत नगरपंचायतीने स्टॉल धारकांना गेल्या वर्षभरात तिन नोटीसा पाठवलेल्या आहेत. नगरपंचायत हद्दीतील अतिक्रमणे काढणे ही नगरपंचायत प्रशासनाची जबाबदारी आहे शिवाय शासनाचे तसे स्पष्ट आदेश असून वाभवे-वैभववाडी नगरपंचायत प्रशासनाकडून दि.१५ मार्च २०२२ रोजी तसा एकमुखी ठराव मंजूर केला आहे.
तसेच सदरचे स्टॉल चे अतिक्रमण असल्यामुळे त्यांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन नगरपंचायत प्रशासन स्टॉल धारकांना देवू शकत नाही.परिणामी एक जबाबदार नागरिक म्हणून सर्व स्टॉल धारकांनी नगरपंचायत प्रशासनाला सहकार्य करावे अशी भूमिका मुख्याधिकारी सुरज कांबळे व नगरपंचायत प्रशासनाने मांडली आहे. दोघेही आपापल्या भुमिकेवर ठाम असल्याने ‘नगरपंचायत से निकला सुरज ढल जायेगा ? या अनशन वालोंका प्रयास सफल होगा..! ये आने वाला समय ही बतायेगा ‘ असेच सध्यातरी म्हणावे लागेल.