एडमिशन संस्थेकडून युवकांची फसवणूक ; बबन साळगावकर यांचा आरोप

सावंतवाडी (प्रतिनिधी): सावंतवाडी येथे सुरू केलेल्या “ऍडमिशन” या संस्थेकडून उद्योजक हर्ष साबळे यांनी   दोन वेळा येथील युवकांची दोनवेळा फसवणूक केली असा आरोप माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे केला. नोकर भरती ,सेटअप बॉक्स, मोफत वायफाय लोकांपर्यंत पोहचले काय? याचे उत्तर श्री साबळेंनी द्यावे असेही ते म्हणाले, ते आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी त्याच्यासोबत माजी नगरसेवक सुरेश भोगटे,विलास जाधव,उमाकांत वारंग उपस्थित होते. श्री साळगावकर म्हणाले, उद्योजक व एक मराठी माणूस म्हणून आपल्याला हर्ष साबळे यांचा अभिमान आहे, मात्र त्यांनी येथील जनतेला खासकरुन येथील बेरोजगार युवकांना नोकरीची आमिषे दाखवून का फसवावे, त्यांची नेमकी कोणती कमजोरी आहे की ते असे करतात. त्यांनी याठिकाणी सुरु केलेल्या ॲडमिशनच्या नावाने दोनवेळा युवकांची फसवणूक केली. 

येथील युवकांसाठी एमपीएससी यूपीएससी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सुरू केलेले बाळासाहेब ठाकरे ज्ञान प्रबोधिनी सेंटरही केव्हाच या ठिकाणावरून दुसरीकडे हलवले मात्र त्याची साधी भनकही जनतेला नाही, अलीकडेच येथे सुरू केलेल्या मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या आडून हा प्रकार त्यांनी केला त्यामुळे श्री साबळे यांना नेमका या ठिकाणी कोण खेळवत आहे याचा शोध आता घ्यावाच लागेल.

श्री साळगावकर म्हणाले ऍडमिशनच्या नावाखाली अलीकडेच या ठिकाणी रोजगार मेळाव्याचे अमित दाखवण्यात आले परंतु हा मिळावा खरोखरच येथील बेरोजगार युवकांची श्रेष्ठ करणार आहोत सहज उपलब्ध होणारी दहा हजाराची नोकरी या ठिकाणच्या मेळाव्यात देऊन त्यांनी फसवणूक केली. तर दुसरीकडे चांदा ते बांदा या योजनेतून गिर गाईंचे स्वप्नही येथील जनतेला दाखवण्यात आले मुळात हर्ष साबळे आणि गाईंचा संबंध काय त्यामुळे श्री साबळे यांनी वेळेत सावध व्हावे त्यांचा टीमलो, शहा, कामत होऊ नये असा सल्लाही त्यांनी दिला.

error: Content is protected !!