कुडाळ आगारातील समस्या मार्गी लावणार -प्रभाकर सावंत

निलेश तेंडुलकर,दादा साईल यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांशी चर्चा

कुडाळ (प्रतिनिधी): कुडाळआगरातील अनियमित सुटणाऱ्या विद्यार्थी फेऱ्याबाबत भाजप पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी आगार बंद आंदोलन छेडले होते याची दखल घेत भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आज सिंधुदुर्ग नगरी विश्रामगृह येथे ओरस मंडळ अध्यक्ष दादा साइल, जिल्हा सरचिटणीस बाळू देसाई, जिल्हा कार्यकारणी सदस्य निलेश तेंडुलकर हीर्लोक हायस्कूलचे मुख्याध्यापक दिनेश म्हाडगुत, वराड गावचे ग्रामस्थ राजन माणगावकर हिंडेवाडी ग्रामस्थ उदय घोगळे, संजय कदम, रमेश कदम, धोंडी सुर्वे यांच्या उपस्थितीत विभाग नियंत्रक अभिजीत पाटील,जिल्हा वाहतूक अधिकारी विक्रम देशमुख व प्रभारी कुडाळ आगार व्यवस्थापक संदीप पाटील यांच्याशी सकारात्मक चर्चा घडवून आणली. जिल्हा कार्यकारी सदस्य व सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्याचे विभागीय उपाध्यक्ष निलेश तेंडुलकर व दादा साईल यांनी कुडाळ आगाराचे बदललेले ड्युटी अलोकेशन पूर्वीप्रमाणेच करण्याची आग्रही मागणी केली त्यावर विभाग नियंत्रण अभिजीत पाटील यांनी अजूनही कर्मचाऱ्यांच्या सूचना लक्षात घेऊन सुधारणा करता येईल असे सांगितले यावेळी हिंडेवाडी डिगस येथील ग्रामस्थांनी दुपारी बारा दहाला सुटणारी कुठं हिंडेवाडी मार्गे 12 .40 ला केल्याने विद्यार्थ्यांना विनाकारण उशीर होत असल्याचे सांगत पूर्वीप्रमाणेच बारा दहाला गाडी सोडण्यात यावी अशी मागणी केली आगाराला प्रभारी व्यवस्थापक असल्याने तो यापुढे आठवड्यातील चार दिवस पूर्ण वेळ कुठे आगारात उपस्थित असले अशी ग्वाही विभाग नियंत्रक अभिजीत पाटील यांनी दिली तसेच कुडाळ आगारातील सर्वच्या सर्व बसेस वेळेवर सुटतील यासाठी आटोक्यात प्रयत्न करण्यात येतील असे त्यांनी सांगितले कुडाळ आगारात कोरोना नंतर नवीन गाड्या आल्या नाही तो याबाबत भाजपचे कार्यकारी सदस्य निलेश तेंडुलकर यांनी पालकमंत्री रवींद्र यांच्याकडे ही व्यथा बोलून दाखवली होती त्याला यश आले असून येथे आठ ते दहा दिवसात पुढे आगाराला दहा नवीन बसेस प्राप्त होत असल्याचे विभाग नियंत्रक अभिजीत पाटील यांनी भाजपचे अध्यक्ष प्रभाकर सावंत यांना सांगितले. वराड- कट्टा, नानेली – कुडाळ या एसटी बसेस सुरू करण्यात येतील असेही चर्चेत ठरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!