भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत ; मालवण येथे पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी साधला संवाद
चौके ( अमोल गोसावी ) : भाजप मध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या दर दिवशी वाढत असल्याचे चित्र मालवण कुडाळ तालुक्यात दिसून येत आहे. गणेश चतुर्थी पूर्वी अजून १२ मोठे प्रवेश होणार आहेत. २०२४ मध्ये निलेश राणे यांच्या विजयाची ही नांदी आहे. असा ठाम विश्वास भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांनी मालवण भाजप कार्यालय येथे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधताना व्यक्त केला.
निलेश राणे यांच्या माध्यमातून सातत्याने कुडाळ मालवण मतदारसंघात फिरून जनतेला अपेक्षित असलेली विकासकामे केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून केली जात आहेत. निलेश राणे यांच्या मागणीनुसार पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून अधिकाधिक विकासनिधी प्राप्त होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप पक्ष तसेच निलेश राणे यांच्या नेतृत्वावर, काम करण्याच्या कार्यपद्धतीवर प्रेरित होत मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत आहे. मालवण कुडाळ मतदारसंघात ठाकरे गट व आमदार वैभव नाईक यांच्या घागरीला मोठे भोक पडले असून सगळेच वाहून जाणार अशी स्थिती ठाकरे गटाची झाली आहे. असा टोला दत्ता सामंत यांनी लगावला. सोबतच भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आगामी सर्व निवडणुकीत १०० टक्के यश मिळवण्याच्याच दृष्टीने कार्यरत राहावे. असेही दत्ता सामंत यांनी सांगितले.
यावेळी यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, माजी सभापती सुनील घाडीगांवकर, भाजप महिला तालुकाध्यक्ष पूजा करलकर, ओबीसी महिला मोर्चा तालुकाध्यक्ष पूजा वेरलकर, माजी नगरसेविका ममता वराडकर, पूजा सरकारे, आप्पा लुडबे, गणेश कुशे, जगदीश गांवकर, खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गावकर, संचालक आबा हडकर, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष महेश सारंग, पंकज पेडणेकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विक्रांत नाईक, मंदार लुडबे, शहर अध्यक्ष ललित चव्हाण, बंड्या पराडकर, विलास मुणगेकर, प्रमोद करलकर, मोहन वराडकर, दत्तात्रय केळुसकर, राजू बिडये, निनाद बादेकर, राज कांदळकर, राजा मांजरेकर, वसंत गांवकर, कमलाकर कोचारेकर, महिमा मयेकर, राणी पराडकर, दिव्या कोचरेकर, महानंदा खानोलकर, प्रशांत बिरमोळे, बाबू कासवकर, ओंकार लुडबे, यशवंत मालंडकर यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.