तरेळे (स्वप्नील तांबे) : ओझरम बौद्धवाडी ते तळेवाडी येथील रस्ता दरवर्षी प्रमाणे ओसीसी क्रिकेट मंडळ व ग्रामस्थ यांच्या श्रमदानातुन झाडी मारून व खड्डे बुजवून रस्ता साफ करण्यात आला. दरवर्षी मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ या रस्त्याची श्रमदानातून डागडूजी करतात, या वर्षीही सदरच्या रस्त्याची डागडुजी करण्यात आली.यावेळीमंडळाचे कार्यकर्ते लवेश तांबे, मनोज तांबे, सुजित तांबे, राज तांबे, निहार तांबे आदि उपस्थित होते. गावाच्या विकासासाठी जे करता येईल ते या पूढेही खरु असे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.