नूतन मंत्री हसन मुश्रीफ आणि प्रकाश आबिटकर यांचे विमानतळावर स्वागत – जिल्हा प्रशासन

कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : नवीन मंत्रीमंडळ स्थापन झाल्यानंतर कोल्हापुरात पहिल्यांदाच आगमन झालेले नूतन मंत्री हसन मुश्रीफ व प्रकाश आबिटकर यांचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोल्हापूर विमानतळावर स्वागत करण्यात आले. प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी मंत्री श्री. मुश्रीफ व मंत्री श्री.आबिटकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी उसेद मुश्रीफ त्यांच्यासोबत होते.

यावेळी महसूल विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी, कागल- राधानगरी उपविभागाचे उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, माहिती अधिकारी वृषाली पाटील, माजी खासदार संजय मंडलिक तसेच अन्य मान्यवर यांनीही त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!