मंत्री नितेश राणेंच्या नागरी सत्काराला उपस्थित राहण्याचे जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे,उद्योजक अचित कदम यांचे आवाहन
कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री पदी निवड झाल्यानंतर नामदार नितेश राणे यांचे सिंधुदुर्गात 22 डिसेंबर रोजी प्रथमच आगमन होत आहे. मंत्री नितेश राणे यांचा भव्य नागरी सत्कार भाजपाच्या वतीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील पटांगणात 22 डिसेंम्बर रोजी सायंकाळी 7 वाजता केला जाणार आहे. या नागरी सत्कार सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, वरवडे येथील युवा उद्योजक अचित कदम यांनी केले आहे. कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच सिंधुदुर्गात मंत्री नितेश राणे येत आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी जिल्हा भाजपा च्या वतीने जंगी तयारी करण्यात आली आहे. कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोर मंत्री नीतेश राणेंचा भव्य नागरी सत्कार सायंकाळी 7 वाजता करण्यात येणार आहे. नामदार नीतेश राणे यांचा नागरी सत्कार सोहळा 5 हजार नागरिकांच्या उपस्थितीत केला जाणार आहे. या नागरी सत्कार सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन संदेश सावंत समीर नलावडे अचित कदम यांनी केले आहे












