सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : नवनगर सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण क्षेत्रात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असून शासकीय कार्यालय परिसरात मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी जिल्हा प्राधिकरण तर्फे एका संस्थेमार्फत आज पकड मोहीम राबवित शासकीय कार्यालयामध्ये भटकत असलेल्या कुत्र्यांना पकडण्यात आले.
सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण क्षेत्रात मोठ्या संख्येने भटके कुत्रे वावरत असून याचा त्रास कार्यालयीन कर्मचाऱ्यांसह नागरिकांना होत आहे. शासकीय कार्यालय व शासकीय कार्यालय परिसरात या भटक्या कुत्र्यांकडून घाण केली जात आहे. तसेच भटक्या कुत्र्यांच्या वावरामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. कचराकुंडीत टाकलेला कचरा, खाद्यपदार्थ रत्यावर विखुरले जात आहेत. याचा त्रास होत असल्याने नागरिकांनी जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले होते. तर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण क्षेत्रात फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी आज पकड मोहीम राबवत अनेक कुत्र्यांना पकडले. यामुळे नागरिक व कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. तर अशी मोहीम सिंधुदुर्गनगरीत महिन्यातून एकदा तरी राबवावी अशी मागणी होत आहे.
: नवनगर सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण क्षेत्रात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असून शासकीय कार्यालय परिसरात मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी जिल्हा प्राधिकरण तर्फे एका संस्थेमार्फत आज पकड मोहीम राबवित शासकीय कार्यालयामध्ये भटकत असलेल्या कुत्र्यांना पकडण्यात आले.