डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आंबडोस येथे स्वच्छता माेहिम

मालवण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र भूषण तीर्थरूप  डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्या सौजन्याने महाराष्ट्र भूषण आ.ति. डॉ नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त  रविवार दिनांक 05/02/2023 रोजी  ता  मालवण जि  सिंधुदुर्ग येथील आंबडोस  स्मशान भूमी व दुतर्फा रस्ता स्वच्छ्ता अभियान राबविण्यात आले या स्वच्छ्ता अभियानात सुमारे 150 सदस्यांनी सहभाग घेतला. सुमारे १.५  टन  कचारा साफ  करण्यात आला. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत आंबडोस गावातील विहीर स्वच्छ्ता अभियान चा भाग राबविण्यात आला होता. सदर स्वच्छ्ता अभियानास सरपंच सूबोधिनी परब व माजी सरपंच दिलीप परब, विष्णु परब, धोंडी नाईक यांनी सदीच्छ भेट दिली.

error: Content is protected !!