ओसरगाव सुविधा केंद्राला जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि प्रसन्ना (बाळू) देसाई यांनी भेट देऊन घेतला आढावा
ओरोस (प्रतिनिधी): गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रविंद्र चव्हाण यांच्यामार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एकजुटीने आणि अहोरात्र मेहनत घेत मुंबई-गोवा सिंगल लेन महामार्ग पुर्ण केली. आता गणेशभक्तांच्या सोयीसाठी आणखी एक उपक्रम विभागाच्या वतीने हाती घेण्यात आला आहे, तो म्हणजे नागरी सुविधा केंद्र सार्वजनिक बांधकाम विभाग, राजापूर यांच्यामार्फत खारेपाटण ते झाराप पर्यंत चार पॉईंट वर उभारण्यात आलेल्या स्वागत व सुविधा केंद्रे यांची सुरवात करण्यात आली आहे. या सुविधा केंद्रामार्फत प्रथमोपचार, पोलीस मदत, चहा स्टॉल, चालकांसाठी विश्रांती शौचालय व्यवस्था इ. मूलभूत सोयीसुविधा पुरवण्यात येणार आहेत. जेणेकरून थकवा कमी होत अपघात होणार नाही. पालकमंत्री रविद्र चव्हाण यांच्यामार्फत पहिल्यांदाच हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. येथील ओसरगाव येथील सुविधा केंद्राला आज भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना (बाळु) देसाई यांनी भेट देत त्याचा आढावा घेतला. यावेळी प्रभाकर सावंत म्हणाले सेवा आणि सुशासन हे पालकमंत्र्यांचे धोरण आहे.