फोंडाघाट (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील हरकुळ खुर्द -दळवीवाडी येथे निवृत्त पोलीस हवालदार प्रदीप रामचंद्र उर्फ पी.आर.सावंत (वय ६०) यांचे अल्पशा आजाराने रविवार २२ डिसेंबर रोजी सायंकाळी निधन झाले. चिपळूण डेरवण येथे उपचारासाठी नेलेले असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला. परोपकारी,मनमिळाऊ स्वभावाचे प्रदीप सावंत हवालदार पी.आर. सावंत म्हणून सर्वांना परिचित होते. ते पीएसआय पदावर बढती होवून निवृत्त झाले होते.त्यांच्या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस प्रशासनात प्रामाणिक सेवा देणारे पी.आर. सावंत यांचे पोलीस प्रशासनात निवृत्ती नंतरही सर्वांशीच जिव्हाळ्याचे संबंध होते. कलमठ दळवी कॉलनी येथे निवृत्तीनंतर ते कुटुंबासह राहत होते. त्यांच्यावर हरकुळ खुर्द स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पश्चात पत्नी, दोन मुलगे,विवाहित मुलगी भाऊ, बहिण असा परिवार आहे.