विभागीय अध्यक्ष अशोक राणे, सचिवांसह तालुका स्तरावरील असंख्य पदाधिकारी,कामगारांनी केला भाजपमध्ये प्रवेश
भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश
कणकवली (प्रतिनिधी): महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेतील इंटक (काँग्रेस) संघटनेला आमदार नितेश राणे यांनी जोरदार धक्का दिला आहे. सिंधुदुर्ग विभागाचे कामगार संघटनेचे अध्यक्ष अशोक राणे यांच्यासह इंटक कामगार संघटनेतील असंख्य पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. आमदार नितेश राणे यांच्या सह भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सरचिटणीस प्रसन्न देसाई,उपाध्यक्ष गोट्या सावंत यांनी या सर्व प्रवेश करणाऱ्या कामगार संघटनेतील पदाधिकाऱ्यांचे भारतीय जनता पार्टीत स्वागत केले.हा पक्षप्रवेश कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी पार पडला. यावेळी भारतीय जनता पार्टी प्रवेश केलेल्या इंटक काँग्रेस कामगार संघटनेचे अशोक राणे- सिंधुदुर्ग विभाग अध्यक्ष इंटक, साईनाथ ओटवकर – सचिव इंटक देवगड आगार, संदेश सुरेश साटम देवगड आगार, प्रफुल्ल तोरस्कर देवगड आगार, विनोद उन्हाळकर देवगड आगार, रोहन सुरेश शिंदे विजयदुर्ग आगार, प्रशांत गावडे कुडाळ आगार, भाऊ सावंत वेंगुर्ला आगर उपाध्यक्ष, समीर कदम कुडाळ आगार, संतोष भाट कणकवली आगार, संजय सावंत कणकवली आगार, मनोज पवार कणकवली आगार,वैभव घाणे , विद्याधर सावंत,महेश पाटील,सुहास वेदरकर अशा इंटक कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कामगारां समवेत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. या प्रवेशावेळी कणकवली विधानसभा प्रमुख मनोज रावराणे,युवक जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री,जिल्हा सोशल मीडिया प्रमुख समीर प्रभुगावकर ,तालुका शहर अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, सरपंच राजन परब,आदी उपस्थित होते.