सिंधुदुर्गच्या प्रवेशद्वारावर खारेपाटणमध्ये क्रेन ने 50 फुटी घातला हार
कणकवली (प्रतिनिधी) : मत्सोद्योग तथा बंदर विकास मंत्री नितेश राणे हे प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होताच कट्टर राणे समर्थक तथा सामाजिक कार्यकर्ता रफिक नाईक यांनी मंत्री नितेश राणे यांचे खारेपाटण मध्ये हटके स्वागत केले. क्रेन ने नितेश राणेंच्या गळ्यात 50 फुटी भलामोठा पुष्पहार घालून रफिक नाईक यांनी मंत्री नितेश राणेंचे स्वागत केले. पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आल्याने त्यांचे भव्य असे जंगी स्वागत खारेपाटण येथे करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते, कट्टर राणे समर्थक रफिक नाईक यांच्या सौजन्याने असलेला भव्य असा पुष्पहार सर्वांसाठी आकर्षक ठरत होता. रफिक नाईक त्यांच्या सौजन्याने भव्य अश्या पुष्पहाराने आमदार नितेश राणे यांचे दमदार स्वागत करण्यात आले. रफिक नाईक यानी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण येथे मंत्री नितेश राणे यांची भेट घेत त्यांचे स्वागत केले.