बडी धेंडे सापडली पोलिसांच्या जाळ्यात
कणकवली (प्रतिनिधी): कणकवली पोलिसांनी आज रात्री 8 वाजण्याच्या सुमारास फोंडाघाट बाजारपेठेत गांधी चौकातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या तीन पत्ती जुगार अड्ड्यावर धाड टाकली.फोंडाघाट बाजारपेठेसह गावातील 8 ते 9 बड्या धेंडा ना जुगार खेळताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्यासह फोंडाघाट दुरक्षेत्राचे हवालदार उत्तम वंजारे, हवालदार विनोद चव्हाण, हवालदार चंद्रकांत झोरे, पोलिस कॉन्स्टेबल किरण मेथे, सचिन माने यांनी हा छापा मारला. सर्व आरोपींना कणकवली पोलीस ठाण्यात आणले असून कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.