दिल्ली मध्ये सिंधुगर्जना ढोलपथकाने दुमदुमवला होता आवाज
कणकवली (प्रतिनिधी): कणकवली शहरातील सिंधू गर्जना ढोल पथक नुकतेच दिल्ली वारी करून आले असून, विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ व अन्य कार्यक्रमांसाठी या ढोल पथकाला पाचारण करण्यात आले होते. या निमित्ताने सिंधुदुर्गाच्या ढोल पथकाचा आवाज दिल्लीत दुमदुमला होता. या पथकाने घेतलेली भरारी कौतुकास्पद असून, हे पथक नुकतेच कणकवलीत माघारी परतले. त्यावेळी या ढोलपथकातील कलाकारांचा कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सर्वेश भिसे, हुमेरा मन्सूरी, यासिन मुल्ला, अनिकेत गोखले आदींचा सत्कार केला. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, राजू गवाणकर यांच्यासह अन्य उपस्थित होते.