कणकवली (प्रतिनिधी): चुकीचा आहार व्यायामाचा अभाव यामुळे मधुमेह, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, हृदयरोग, लठ्ठपणा, संधिवात या आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे. या सर्व आजारांवर वेळीच निदान, उपचार केल्यास पुढील गंभीर दुष्परिणाम टाळता येतात यासाठी माधवबाग शाखांद्वारे ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित साधून वरील आजाराने त्रस्त असलेल्या तसेच अँजिओप्लास्टी व बायपासचा सल्ला दिलेला जेष्ठ नागरिक रुग्णांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन दिनांक 01 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत करण्यात आले आहे. या तपासणीमध्ये ब्लडप्रेशर, ब्लड शुगर (रँडम), हार्ट रेट व वैद्यकीय सल्ला तसेच गरजेनुसार ECG, TMT या तपासण्या मोफत केल्या जातील तरी सर्व ज्येष्ठ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे माधवबाग परिवाराकडून आवाहन करण्यात आले आहे. नाव नोंदणी आवश्यक संपर्कासाठी माधवबाग कणकवली: 9375183888, कुडाळ: 901132858, सावंतवाडी: 7774028185