सिंधूदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदा टी 10 क्रिकेट सामन्यांचे आयोजन

शिवसेना नांदगाव शाखाप्रमुख राजा म्हसकर यांचे आयोजन

मनोज इलेव्हन विजेता तर शिवारा सुपर कणकवली ठरला उपविजेता

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शिवसेना शाखा नांदगाव ह्यांच्या वतीने शाखाप्रमुख राजा म्हसकर ह्यांच्या संकल्पनेतून भगवा चषक तालुकास्तरीय टी 10 भव्य दिव्य क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले ह्या क्रिकेट सामन्यांचे आयोजन आराधना मैदान ह्या ठिकाणी करण्यात आले होते, ह्या सामन्यांचा उद्घाटन सोहळा शिवसेना नेते संदेशजी पारकर ह्यांच्या हस्ते पार पडला ह्या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे रायगड भूषण शिवशंभूशाहीर गणेश ताम्हाणे . शाहीर गणेश ह्यांनी आपल्या पहाडी आवाजात दमदार पोवड्याने मैदानात खचाखच भरलेल्या प्रेक्षकांची , खेळाडूंची , मान्यवरांची मने जिंकली. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर , हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला ह्या सामन्यांसाठी एकुण 8 संघांनी सहभाग घेतला होता, सर्वच सामने रोमहर्षक झाल्यामुळे क्रिकेट प्रेमींनी शाखा प्रमुख राजा म्हसकर ह्यांचे तोंड भरून कौतुक केले आहे. ह्या सामन्याचा उपविजेता शिवारा सुपर कणकवली संघ ठरला असून असून पहिल्या भगवा चषकावर मनोज इलेव्हन ह्या संघाने आपले नाव कोरले.मालिकविर म्हणून मनोज इलेव्हन संघाचा कर्णधार विकास कदम याला सन्मानित करण्यात आले. ह्या कार्यक्रमात पंचक्रोशीतील ज्येष्ठ खेळाडू , रत्नदीप तांबे , सलीम बोबडे, सिद्धार्थ तांबे, आप्पा गुरव ह्यांचा ही शाखेतर्फे यथोचित सन्मान ,सत्कार करण्यात आला

रविवारी 5 फेब्रुवारी सायंकाळी , प्रमुख पाहुणे गजानन रेवडेकर , कृष्णा कांदळकर , वसंत कांदळकर , मालती माधव खोत ह्यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले ह्या तीन दिवसाच्या क्रिकेट सामन्यांसाठी मेहनत घेऊन काम करणारे कार्यकर्ते रोहित तांबे , सागर तांबे , सतीश तांबे , समीर तांबे , जितेंद्र तांबे , पंडित तांबे , रोशन तांबे ,निलेश तांबे , भालचंद्र तांबे ,धम्मरत्न यादव , गणेश पाटील , ह्यांचे शिवसेना शाखा नांदगाव ह्यांच्या वतीने आभार मानण्यात आले. पुढील वर्षीही ह्या ही पेक्षा मोठ्या स्वरूपात , नव्या दिमाखात सामने पार पडतील अशी ग्वाही राजा म्हसकर ह्यांनी जमलेल्या प्रेक्षकांना आणि खेळाडूंना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!